शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या फिर्यादीवरुन वडीलांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:34 IST

पत्नीचा केला होता खून : आर्वी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : घरगुती कारणावरुन पतीने पत्नीचा काठीने मारहाण करत निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील आर्वी शिवारात घडली होती़ याप्रकरणी साक्षीदारांच्या साक्षी आणि घटनेचा लावण्यात आलेला तपास यावरुन संशयित पतीला न्यायाधीश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा शुक्रवारी ठोठावली़ सरकारी वकील म्हणून पराग पाटील यांनी कामकाज पाहीले़ धुळे तालुक्यातील आर्वी येथील किसन श्रीपत पाटील यांच्या शेतातील घरात सदाशिव किसन शेणगे (पाटील)  हा आपल्या परिवारासोबत राहत होता़ १० जुलै २०१६ रोजी ४ ते साडेचार वाजेच्या सुमारास त्याची पत्नी सुरेखाबाई सदाशिव शेणगे आणि मुलगी प्रिती झोपलेले असताना घरगुती कारणावरुन वाद केला आणि सदाशिव याने पत्नी सुरेखाबाई हिला काठीने मारहाण केली़ यात जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू ओढवला़ याप्रकरणी त्याची मुलगी प्रिती सदाशिव शेणगे (पाटील) हिने धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती़ त्यानुसार सदाशिव किसन शेणगे (पाटील) (४५), सुनील किसन शेणगे (पाटील) (४३) आणि कमलाबाई किसन (पाटील) (६५) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ न्यायाधीश मंगला धोटे यांच्या न्यायालयात या प्रकरणाचे कामकाज पार पडले़ ७ जणांच्या साक्षी तपासण्यात आल्याने त्या महत्वपुर्ण ठरल्या़ तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एम़ के़ बनसोडे यांनी योग्य दिशेने तपास केला़ त्यामुळे साक्षी आणि सादर झालेले पुरावे तपासून न्यायाधीश मंगला धोटे यांनी संशयित आरोपी सदाशिव किसन शेणगे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ आणि पोलीस निरीक्षक भरत जाधव यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले़ पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक आऱ ए़ पवार होते़ 

टॅग्स :DhuleधुळेCourtन्यायालय