शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:01 IST

पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांची पोलिस पाटील यांना सुचना

शिरपुर : कोरोनाच्या दुसºया लाटेला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात रोज रूग्णांचा आकडा वाढत आहे. संपुर्ण जगात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात मास्क वापरण्याचे प्रमाण अल्प आहे. लग्न कार्यात कोरोनाचा जास्त प्रसार होत आहे. म्हणुन गर्दीच्या ठिकाणी कार्यवाही करा. तर सर्वांना स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क वापरण्यासाठी जनजागृती करा. तर पन्नास पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. ग्रामीण भागात पोलिस पाटील महत्वाचा दुवा असुन त्यांना मोठी जबाबदारी आहे. कुठल्याही परिस्थितीत कोरोनाची दुसरी लाट थोपवायची आहे. अशी सुचना पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी पोलिस पाटील यांना मार्गदर्शन करतांना केली़

थाळनेर पोलिस स्टेशन येथे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी वार्षिक तपासणी निमित्ताने भेट दिली. यावेळी थाळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटील यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, पोलिस अधिक्षक यांचे राईटर प्रकाश पाटील, थाळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांच्यासह महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा अध्यक्ष छोटुलाल पाटील तोंदे, थाळनेर झोन अध्यक्ष नितीन जाधव बभळाज, मोतीलाल परदेशी हिसाळे, जितेंद्र चौधरी वाठोडा, पोलिस पाटील सौ.सुरेखा जाधव भोरटेक, सौ. रुपाली बैसाणे मांजरोद आदी उपस्थित होते़

मास्क वापरल्याने ७० टक्के संरक्षण मिळते. लोकांना आता लॉकडाऊन नको असेल तर काळजी घ्या़ स्वताची काळजी स्वत: घ्या़ पोलिस प्रशासन काम करीत आहे. तरी जबाबदार नागरिक म्हणुन आपली देखील काही कर्तव्य आहेत. जेष्ठ लोकांना शक्य तेवढी लवकर लस टोचुन घ्या असे चिन्मय पंडीत यांनी सांगितले.

याप्रसंगी हद्दीतील पोलिस पाटील यांनी वेगवेगळ्या समस्या मांडल्या़ त्यात वेळेवर मानधन मिळावे. कोरोना लससाठी पोलिस पाटील यांना प्राधान्य द्यावे. समस्या मांडल्यावर पोलिस अधिक्षक यांनी समस्या लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार पिंप्रीचे पोलिस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलिस कर्मचारी व पोलिस पाटील बांधव यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलिस पाटील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.