शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
3
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
4
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
5
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
6
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
9
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
10
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
11
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
20
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

एकुलत्या मुलाच्या मृत्यूने गांगुर्डे कुटुंबीयांचा आक्रोश

By admin | Updated: April 19, 2017 00:55 IST

तलावीपाड्याचे आजोबा-नातू ठार : जावळाचा कार्यक्रम आटोपून येत असतानाची घटना

नंदुरबार : तलावीपाडा, ता. नंदुरबार येथील आजोबा-नातूचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याने गावात शोकाकूल वातावरण आहे. गांगुर्डे कुटुंबाचा एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
तलावीपाडा येथील बान्या चमाºया गांगुर्डे (५०) हे आपल्या नातवासह राहुल कृष्णा गांगुर्डे (१३) याच्यासोबत धवळीविहीर येथे नातेवाइकांच्या जावळाच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी गेले होते. जाऊळ आटोपून विसरवाडी येथे कामानिमित्त थांबले. तेथून तलावीपाडा गावी परत येत असताना हा अपघात घडला. आजोबा-नातूला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बान्या गांगुर्डे यांना दोन मुले, पैकी कृष्णा हा मोठा. त्याला राहुल हा एकुलता एक मुलगा. सध्या शाळेला सुट्या लागल्याने त्याने आजोबांसोबत मोटारसायकलीवर जावळाला जाण्याचा हट्ट धरला. ऊन असल्यामुळे आजोबांनी त्याला नकार दिला होता. परंतु हट्टामुळे त्याला घेऊन जावे लागले. परत येत असताना हा अपघात झाला.
अपघाताची माहिती तलावीपाडा येथे कळताच नातेवाईक घटनास्थळाकडे धावले. रात्री उशिरा दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. सरपंच शत्रुघ्न गांगुर्डे यांनी त्यासाठी मदत केली. रात्रीच दोघांवर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले.
गांगुर्डे कुटुंबीयावर झालेल्या अघातामुळे गावात शोककळा पसरली आहे. राहुल हा मुलगा मनमिळावू व हुशार होता. नुकत्याच झालेल्या परीक्षेत चांगले गुण मिळविणार असल्याचे त्याने वडील कृष्णा यांना सांगितले होते.