शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

औषधी वनस्पती लागवडीत तामसवाडीतील शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 21:40 IST

पुण्याच्या कंपनीतील पती-पत्नीविरुध्द गुन्हा दाखल

धुळे : तालुक्यातील तामसवाडी येथील दोघा शेतकऱ्यांची पुण्यातील एका कंपनीने फसवणूक केली. कंपनीने औषधी वनस्पती लागवडीसाठी प्रेरीत करुन प्रत्यक्षात उत्पादन घेतल्यानंतर या शेतकऱ्यांना पैसेच न दिल्याने सोनगीर पोलीस ठाण्यात पुण्याच्या कंपनीतील दोघाविरुध्द सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.पुणे येथील एका कंपनीच्या प्रतिनिधींनी मार्च २०१८ मध्ये धुळे तालुक्यातील तामसवाडी येथील शेतकरी शिवाजी जर्नादन पाटील आणि विशाल प्रभाकर बोरसे या दोघांना शतावरी वनस्पती लागवडीसाठी प्रेरीत केले. लागवडीसाठी रोपे कंपनी पुरविणार असल्याने मे २०१८ मध्ये या दोघा शेतकऱ्यांनी रोपांचे पैसे भरल्यानंतर कंपनीने रोपे पुरविली. त्यानुसार दोघा शेतकऱ्यांनी शतावरीची लागवड केली. जानेवारी २०२० मध्ये सदर रोपांची काढणी करायची असल्याने या दोघांनी कंपनीला सुचित केले असता त्यांनी या दोघांना तुम्हीच कापणी करा आणि एकत्रित माल कंपनीला पोहचवा, असे सांगितल्याने मार्च २०२० मध्ये शतावरीची कापणी करण्यात आली. त्यानंतर स्वत:चे वाहन करुन या दोघांनी तो माल कंपनीला पोहचही केला. मात्र त्यानंतर कंपनीने पैसे देण्यास टाळाटाळ केली. अगदीच तगादा लावल्यानंतर कंपनीकडून या दोघांना धनादेश देण्यात आला. त्यात शिवाजी पाटील यांना १६ लाखांचा तर विशाल बोरसे यांना १३ लाख ५८ हजार रुपयांचा धनादेश मिळाला. मात्र सदरचा धनादेश हा बँकेत भरला असता कंपनीने त्यांचे खातेच बंद केल्याचे आढळून आले. त्यानंतर या दोघांनी कंपनीचे कार्यकारी संचालक ऋषिकेश लक्ष्मण पाटकर आणि त्यांच्या पत्नी मधुरा यांच्याशी संपर्क साधून पैशांची मागणी केली. त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने दोघाविरुध्द संशयावरुन सोनगीर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :Dhuleधुळे