अर्थे येथे दुकानदाराला ५०० रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST2021-04-19T04:33:28+5:302021-04-19T04:33:28+5:30

कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर केलेला आहे़ या तालुक्यातदेखील संचारबंदी करण्यात आली आहे़ त्यावर वॉच ठेवण्यासाठी प्रत्येक ...

A fine of Rs 500 to the shopkeeper here | अर्थे येथे दुकानदाराला ५०० रुपयांचा दंड

अर्थे येथे दुकानदाराला ५०० रुपयांचा दंड

कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर केलेला आहे़ या तालुक्यातदेखील संचारबंदी करण्यात आली आहे़ त्यावर वॉच ठेवण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे़ गटविकास अधिकारी युवराज शिंदे यांनी पंचायत समिती अंतर्गत कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गावात साथरोग नियंत्रणात आणणेकामी आदेशित केलेले आहेत़ त्यानुसार १८ रोजी अर्थे खुर्द व अर्थे बुद्रुक गावात पथक प्रमुख डी. पी. बुवा (शि. वि. अधिकारी), अर्थे खुर्दे सरपंच दीपाली पाटील, पोलीस पाटील किशोर पाटील, मंडल अधिकारी संजय जगताप, तलाठी स्वाती कोळी, ग्रामसेवक आर. ए. माळी, अनिल पाटील, अर्थे बु़ सरपंच साहेबराव पाटील, पोलीस पाटील पिरण पाटील, मुख्याध्यापिका निकम, भटू शेवाळे, विलास पवार आदींनी गावात फेरी मारून कोरोनासंदर्भात जनजागृती केली़ वारंवार हात साबणाने धुवा, सॅनिटायझर करा, सुरक्षित अंतर ठेवा व तोंडाला मास्क वापरण्याच्या सूचना दिल्यात़ कामाशिवाय बाहेर पडू नका, असे देखील आवाहन केले़

त्यानंतर गावातील बसस्थानकाजवळील एका कॉम्प्लेक्समध्ये चहाचे दुकान अर्धवट उघडे दिसले़ त्या दुकानदाराला पथकाने दुकान सुरू ठेवल्याबद्दल ५०० रुपयांचा दंड ठोकला़ तसेच विना मास्क फिरणाऱ्या ३ व्यक्तींना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड केला तसेच गावात मुक्तपणे फिरणारे, गर्दी करणारे, विना मास्क फिरणाऱ्यांना समज देण्यात आली.

Web Title: A fine of Rs 500 to the shopkeeper here