शेतकऱ्यानी वाटले ग्रामस्थांना फुकटात टरबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:09 PM2020-03-25T12:09:52+5:302020-03-25T12:10:13+5:30

कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर सर्वसामान्यांसह सर्वांनाच बसला फटका

The farmers felt the watermelon in free of cost to the villagers | शेतकऱ्यानी वाटले ग्रामस्थांना फुकटात टरबुज

शेतकऱ्यानी वाटले ग्रामस्थांना फुकटात टरबुज

Next

धुळे : कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर सर्वसामान्य नागरिक, व्यापारी तसेच शेतकऱ्यांना चांगलाच फटका सहन करावा लागत आहे़ त्यामुळे तालुक्यातील तिसगाव-ढंडाने येथील टरबुज उत्पादक शेतकरी भानुदास पाटील यांनी ग्रामस्थांना टरबुज फुटकात देण्याचा निर्णय घेतला आहे़
यंदा मुबलक पाऊस झाल्याने उन्हाळी पिके घेण्यासाठी टरभुज लागवड केली होती़ त्यासाठी परिसरातील शेतकºयांनी लाखो रूपये खर्च करून टरभुज लागवड केली़ सुरुवातील शेताची मशागतीला एकरी ५ ट्रॅकटर शेण खत टाकून मशातगत केली होती़ तसेच मल्चिंग पेपरची अस्तरीकरण करून एकरी १० हजार रोपाची लागवड केली़ त्यासाठी महागळे खते देण्यात आली होती़ तसेच वातावरणातील होणारे बदल आणि त्याची फवारणी करून या संवेदनशील पिकाला वाचवली होती़ त्यासाठी तिसगाव येथील भानुदास पाटील यांनी दोन ऐकरासाठी अंदाजे लाखो रुपये खर्च आला होतो़ एैन टरभुज विक्रीच्या काळात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशावर आल्याने सर्वत्र चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे़ त्यामुळे शासनाकडून जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ कोरोना विषाणुमुळे एकही व्यापारी शेताकडे टरबुज खरेदीसाठी फिरकला नाही़
टरबुज उत्पादन शेतकºयांनी टरबुज खरेदीसाठी व्यापाºयांशी वारंवार संपर्क साधला मात्र, लॉकडाऊन कारण पुढे येत असल्याने लाखो रुपये खर्च करून टरभुज पीक टाकायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित होतो़ त्यामुळे गावातील सर्व गावकºयांना सांगून ही फळे फुकट घेऊन जा, असा धाळसी निर्णय शेतकरी पाटील यांनी घेतला आहे़
कोरोना विषयी शासनाच्या नियमाचे पालन करून व गावासह परिवाराचे हित जोपासण्यासाठी केलेला खर्च वाया गेला तरी चालेल, पण शहरात आणि बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार नाही़ त्यामुळे गावातील सर्व ग्रामस्थांना फुकटात टरबुज देण्यासाठी शेत मोकळे केले आहे.
- भानुदास पाटील, शेतकरी

Web Title: The farmers felt the watermelon in free of cost to the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे