अफवांवर विश्वास ठेवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 22:42 IST2020-05-28T22:41:33+5:302020-05-28T22:42:33+5:30

जिल्हाधिकारी : धुळे शहरात ३१ मेपर्यंत कायम आहे लॉकडाउन

Don't believe the rumors | अफवांवर विश्वास ठेवू नये

अफवांवर विश्वास ठेवू नये

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे महानगरपालिका हद्दीत ३१ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या आदेशात तूर्त कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी समाजमाध्यमांवर विशेषत: व्हाट्सअ‍ॅपवर फिरणाऱ्या खोट्या, निराधार संदेशांकडे लक्ष देवू नये़ संपूर्ण लॉकडाऊनचे पालन करीत कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून सर्वंकष प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून धुळे महानगरपालिका हद्दीत ३१ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यातून काही अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
मात्र, बुधवारपासून व्हाट्सअ‍ॅपवर सवलती मिळणार असल्याचा संदेश फिरत आहे. तो संपूर्ण खोटा व निराधार आहे. असा कोणताही निर्णय धुळे जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन कायम आहे. ३१ मे नंतर नंतर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे योग्य ते निर्णय घेऊन जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील़ असे बदल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृतरित्या विविध माध्यमातून प्रसिद्धीसाठी देण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे़
लॉकडाउन शिथील करण्याची मागणी
इतर शहरांप्रमाणे धुळे शहरातही लॉकडाउन काही अंशी शिथील करावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे़ व्यापाºयांनी बुधवारी प्रशासनाशी चर्चा करुन दुकाने सुरु करण्याची परवानगी मागितली आहे़

Web Title: Don't believe the rumors

टॅग्स :Dhuleधुळे