शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय शंभू पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 11:36 IST

सामाजिक, शैक्षणिक, कला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

ठळक मुद्दे  सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, वैद्यकीय,  उद्योजक, पर्यावरण, कृषी, कला क्षेत्रातील एकूण ४५  मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

धुळे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून  छत्रपती युवा क्रीडा मंडळ महाराष्ट्र राज्य व शाओलीन कुंग फु इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानाने  राज्यस्तरीय शंभू पुरस्कारांचे गुरूवारी रात्री थाटात वितरण करण्यात आले.  कल्याण भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय खो खो संघाचे माजी  कर्णधार  आनंद पवार  होते.  प्रमुख पाहूणे म्हणून फफुटा मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण काटे, लेखक हरी महाजन,  गायक पी.गणेश, अभिनेते  गणेश खाडे, अभिनेत्री अपूर्वा शेलगावकर, व्ही. सुरेंद्रन, आयोजन समिती अध्यक्ष विकास मराठे , सचिव प्रसाद पाटील , मनोज रुईकर, हेमंत भडक, अनिल पाटील आदी उपस्थित होते. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष होते.   यावेळी   सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, वैद्यकीय,  उद्योजक, पर्यावरण, कृषी, कला क्षेत्रातील एकूण ४५  मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आयोजन समिती अध्यक्ष विकास मराठे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  संदेश दाभाडे, मंगेश पाटील, प्रमोद पाटील, दिग्विजय पाटील, ऋषीं दाभाडे, कुणाल चौधरी, शुभम शिंदे, पंकज पाटील, राजेंद्र देवरे, पवन सोनार आदींनी परिश्रम  घेतले.  प्रास्ताविक  विकास मराठे यांनी  केले सूत्रसंचालन कुलकर्णी यांनी केले.  या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त विजेते असेजितेंद्र देसले, यशवंत गोसावी, मनीषा माळी,  शिवमती किरण नवले, प्रवीण महाजन, अनिल मराठे, योगेश पाटील, विनायक खोत, प्रज्ञा मालपुरे, वैशाली मालपुरे, दीपक पाटील, अतुल दहिवेलकर, अनिल चव्हाण, पवन मराठे, डॉ.योगेश ठाकरे, डॉ. अमित पाटील, कैलास देवरे, पांडुरंग पाटील,  संतोष देवरे, नितीन पाटील, गोकुळ पाटील, डॉ. विजय भोसले, प्रज्ञा पाटील, प्रसाद पाटील, गिरीश दारुंटे, वीरेंद्र मोर, प्रा. रवींद्र निकम,  रामकृष्ण सूर्यवंशी, सरमोड पाटील, स्वप्नील रमेश पाटील, विशाल सूर्यवंशी, प्रवीण बारकू खैरनार यांना पुरस्कार दिला. मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. . 

 

टॅग्स :Dhuleधुळे