शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत तुल्यबळ उमेदवारांवरच भिस्त राहणार अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:03 IST

सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहचण्यासाठी अहोरात्र परिश्रमाची गरज

आॅनलाइन लोकमतधुळे :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अनेक पक्ष रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपबरोबरच महाविकास आघाडीलाही त्याच तोडीचे तुल्यबळ उमेदवार द्यावे लागतील. तरच त्यांचे सत्ता स्थापण्याचे स्वप्न साकारू शकेल, अशी चर्चा आहे.भाजपसह सर्वच प्रमुख पक्षांतर्फे नुकत्याच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम पार पडलेला आहे. संभाव्य उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झालेली असल्याची चर्चा आहे. त्यात कोणा-कोणाला संधी मिळते याकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपसह महाविकास आघाडी त्याचबरोबर विविध लहान-लहान पक्षही निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शिवाय अपक्षांची भाऊ गर्दीही मोठ्या प्रमाणावर असेल. या सर्वांमुळे मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर होण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक पक्षाला गट व गणात तुल्यबळ उमेदवार द्यावे लागणार आहे.ेगेल्यावेळी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्या खालोखाल भाजपला जागा मिळाल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादी हे तीनही पक्ष एकत्र येत त्यांनी महाविकास आघाडीची मोट बांधलेली आहे. तर भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असाच सामना होणार आहे. असे असले तरी दोन्ही पक्ष तुल्यबळ असल्याने, त्यांना त्यानुसारच उमेदवार द्यावे लागतील.पक्ष कितीही मोठा असला तरी स्थानिक उमेदवाराचा संपर्क, त्याने आतापर्यंत केलेली समाजपयोगी कामे याचा विचार करूनच अनेकजण मतदान करीत असतात, हे वास्तव आहे. भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने, या निवडणुकीत भाजपला सर्वच गट व गणांमध्ये तुल्यबळ उमेदवारच द्यावे लागतील. तरच सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहचण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होवू शकणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे