शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुका काँग्रेसतर्फे कापडणे आरोग्य केंद्राबाहेर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST

काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व्ही. पी. नागे यांना निषेधात्मक निवेदन देण्यात आले. ...

काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व्ही. पी. नागे यांना निषेधात्मक निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना लसीकरण गतिमान करावे. देशात कोरोनाच्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. केंद्र सरकारकडून देशातील सर्व राज्यांना लसीकरणाचा पुरवठा करण्यात येतो, प्रारंभीच्या काळात महाराष्ट्रात मिळालेल्या लसीमुळे देशात महाराष्ट्राने लसीकरण मोहिमेत प्रथम क्रमांक मिळविला. मात्र, केंद्र सरकारने गेल्या आठवडाभरापासून आपले धोरण बदललेले असून महाराष्ट्र राज्यापेक्षा लोकसंख्येने लहान असलेल्या इतर राज्यांना जास्तीचा लसींचा पुरवठा करीत आहे. महाराष्ट्राचा कोटा कमी करण्यात आल्याने राज्यातील लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. केंद्र सरकारच्या या सापत्नभावाच्या भूमिकेचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करीत आहे.

कापडणे ग्रामपंचायतच्या सरपंच सोनीबाई भील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, उपसरपंच प्रतिनिधी अंजनकुमार पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य शरद माळी, ग्रामपंचायत सदस्य अक्काबाई भिल ,जितेंद्र भिल, प्रवीण पाटील, प्रमोद पाटील, कपिल बोरसे, मनोहर पाटील, नाना भामरे, गंगाराम भिल, पांडुरंग पाटील आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या असून सदर निवेदन कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.