धुळयातील विद्यार्थिनी, शिक्षक पॅाझिटिव्ह, पाच दिवस शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 03:44 PM2021-03-03T15:44:37+5:302021-03-03T15:44:58+5:30

शाळांमध्ये करण्यात आली फवारणी

Dhule students, teachers positive, sprayed in closed schools for five days | धुळयातील विद्यार्थिनी, शिक्षक पॅाझिटिव्ह, पाच दिवस शाळा बंद

धुळयातील विद्यार्थिनी, शिक्षक पॅाझिटिव्ह, पाच दिवस शाळा बंद

Next


धुळे- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, बुधवारी कमलाबाई कन्या शाळेतील दहावीची विद्यार्थिनी व चितळे माध्यमिक विद्यालयातील एक शिक्षकाचा अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने, शाळा पाच दिवसापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
शहरातील जयहिंद शाळेतील १३ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अहवाल पॅाझिटिव्ह आल्यानंतर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेहोते. मात्र ज्या शाळांमध्ये शिक्षक, विद्यार्थी पॅाझिटिव्ह नसतील तेथील दहावी, १२वीचे वर्ग सुरू ठेवण्यास परवानगी मिळालेली होती. मात्र बुधवारी कमलाबाई कन्या शाळेतील दहावीची विद्यार्थिनी व चितळे माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाचा अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने या दोन्ही शाळा पाच दिवस म्हणजे ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 

Web Title: Dhule students, teachers positive, sprayed in closed schools for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.