शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

गौरव पुरस्कारापासून धुळे जिल्हा वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 18:42 IST

डॉ़ आनंदीबाई जोशी पुरस्कार : चौकशी करण्याची अ‍ॅड़ चंद्रकांत येशीराव यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : डॉ़ आनंदीबाई जोशी यांचा अवमान करणारे आणि जिल्ह्यास गौरव पुरस्कारापासून वंचित ठेवणारे अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी करण्यात यावी़ त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी डॉ़ आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार जिल्हास्तरीय निवड समितीचे सदस्य अ‍ॅड़ चंद्रकांत येशीराव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे़ भारतातील पहिल्या महिला डॉ़ आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतिपित्यर्थ शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने दरवर्षी शासकीय तथा अशासकीय आरोग्य संस्थांना पुरस्कार देण्यात येतो़ पुरस्कार हा रोखीने व प्रमाणपत्र स्वरुपात देण्यात येत असतो़ यामध्ये ५ हजारापासून तर एक लाखांपर्यंत वैयक्तिक तसेच संस्था स्तरावर पुरस्कार देण्यात येतो़ यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात डॉ़ आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार जिल्हास्तरीय निवड समिती स्थापन करण्यात आलेली आहे़ ही समिती आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अथवा उपजिल्हा रुग्णालय यांना भेट देत असते़ निवड समितीने पुरस्काराच्या निकषाप्रमाणे मुल्यमापन करुन सदर अहवाल समितीचे सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर बैठकीमध्ये ठेवायचा असतो़ त्या अहवालावर चर्चा होऊन पुरस्कार प्राप्त आरोग्य संस्थांची निवड केली जाते़ यामध्ये आरोग्य उपकेंद्रासाठी २२, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २७ तसेच ग्रामीण रुग्णालय अथवा उपजिल्हा रुग्णालयासाठी ३० निकष देण्यात आलेले आहेत़ या निकषांच्या आधारे समितीने प्रत्यक्ष पाहणी करुन मुल्यमापन करावयाचे असते़ २०१७-१८ या वर्षात समितीने प्रत्यक्ष भेटी देवून मुल्यमापन करुन अध्यक्षांसमोर अहवाल ठेवण्यात आला होता़ त्यावर चर्चा होऊन पुरस्कार प्राप्त आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली होती़ पुरस्कार वितरणापुर्वी याबाबत एक तक्रार आली आणि ही प्रक्रिया वादात सापडली़ परिणामी पुरस्कार वितरण झालेले नाही़ २०१८-१९ या वर्षात शासनाच्या परिपत्रकानुसार डॉ़ आनंदीबाई जोशी पुरस्कार देण्यासाठी कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आल्याचे दिसून आलेले नाही़ परिणामी याही वर्षी पुरस्काराचे वितरण होऊ शकलेले नाही़ 

पुरस्काराचे वितरण मागील दोन वर्षापासून होऊ शकलेले नाही़ ही खेदजनक बाब आहे़ पुरस्कार वितरण समारंभास कोणत्या गंभीर बाबीमुळे स्थगिती आली, याची कसून चौकशी झाली पाहीजे़ - अ‍ॅड़ चंद्रकांत येशीराव

टॅग्स :Dhuleधुळे