शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रोखण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 17:25 IST

प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे : नियमांचे पालन करावे, नागरिकांनी घाबरून जावू नये

धुळे - धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत वाढला आहे. असे असले, तरी आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. नागरिकांनी कोरोना विषाणूविषयक नियमांचे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी केले आहे.धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार २६९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी १६ हजार २७७ रुग्ण बरे होवून घरी परतले असून ३९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या दोन हजार ५९७ रुग्ण श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, एसीपीएम डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, महानगरपालिकेचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत.कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध आहेत. त्यात श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेन्टिलेटर्ससह ३५ खाटा, आॅक्सिजनयुक्त १००, तर सर्वसाधारण ३५० खाटा उपलब्ध आहेत. सध्या २०८ रुग्ण उपचार घेत असून आॅक्सिजनचा टँक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. याशिवाय एसीपीएम रुग्णालयात १००, जिल्हा रुग्णालयात ६०, महानगरपालिकेचे जिल्हा रुग्णालयात ६०, उपजिल्हा रुग्ण्णालय, शिरपूर येथे ८०, उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे ४०, साक्री येथे ३० खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी बहुतांश खाटा या आॅक्सिजनच्या सुविधेसह आहेत. तसेच तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. तेथे १८०० खाटा उपलब्ध होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वॅब कलेक्शन सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या औषधोपचारसाठी आवश्यक सर्व साधनसामग्री, औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. एकीकडे कोरोना विषाणूच्या रुग्णांवर औषधोपचार सुरू असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला सुरवात करण्यात आली आहे. ९१ टक्के आरोग्य कर्मचा?्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला असून फ्रंट लाइनवरील ६३ टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. शासकीय, महानगरपालिकेसह खासगी रुग्णालये मिळून ५६ आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू असून रोज सरासरी साडेपाच हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हे वास्तव आहे. बाधित रुग्ण व त्याच्या संपर्कातील किमान २० जणांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांच्या सहकायार्ची आवश्यकता आहे. माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेत आढळून आलेल्या सहव्याधी रुग्णांच्या संपर्कात आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत. असे प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी सांगितले़जिल्हाधिकारी म्हणतात- प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे- हात सॅनेटायझर अथवा साबणाने वेळोवेळी स्वच्छ करावेत- तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वित- गृहविलगीकरणातील व्यक्तींवर आरोग्य विभागाचे लक्ष- विवाह सोहळ्यांसाठी फक्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा- विवाह सोहळ्यांसाठी तहसीलदारांची पूर्व परवानगी आवश्यक- ग्रामसेवक, तलाठी, पोलिस विभागावर जबाबदारी- मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार- नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये- धुळे जिल्ह्यात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश- अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे