शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळातही सुरू होत्या प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST

धुळे - जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळातही प्रसूती सुरूच होत्या. त्यामुळे खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी एकाही महिलेला खासगी रुग्णालयात रेफर ...

धुळे - जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळातही प्रसूती सुरूच होत्या. त्यामुळे खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी एकाही महिलेला खासगी रुग्णालयात रेफर केले नसल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली. जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. त्यात साक्री तालुक्यात दोन रुग्णालये आहेत. तर धुळे, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी एक ग्रामीण रुग्णालय आहे. साक्री तालुक्यात साक्री व पिंपळनेर येथे ग्रामीण रुग्णालय आहे व निजामपूर येथील नियोजित ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू झालेले आहे. धुळे तालुक्यात सोनगीर व शिरपूर तालुक्यातील थाळनेर याठिकाणी तसेच शिंदखेडा येथे ग्रामीण रुग्णालय आहे.

साक्री येथील ग्रामीण रुग्णालय वगळता इतर ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची व्यवस्था नाही. जर सिझेरियन करायचे असेल तर जिल्हा रुग्णालयात किंवा वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना रेफर केले जाते. मात्र नॉर्मल प्रसूतीवरच ग्रामीण रुग्णालयात भर दिला जात आहे. नॉर्मल प्रसूती करणे शक्य नसेल तरच जिल्हा रुग्णालयात रेफर करीत असल्याचे वैद्यकीय अधीक्षकांचे म्हणणे आहे. तसेच २०२० यावर्षी प्रसूतीची संख्या कमी झालेली नाही. केवळ साक्री येथील ग्रामीण रुग्णालयातच सिझेरियनची व्यवस्था आहे. इतर रुग्णालयांमध्ये रक्ताची व्यवस्था नसल्यामुळे त्याठिकाणी सिझेरियन करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. साक्री येथील सिझेरियनचे प्रमाण मात्र कोरोना काळात खूपच कमी झाले आहे. २०१९ यावर्षी ६५ सिझर झाले होते तर २०२० मध्ये केवळ सहा सिझर झाले आहेत. २०२० यावर्षात थाळनेर येथे ४०, शिंदखेडा २१० व पिंपळनेर येथे ३४० प्रसूती झाल्या आहेत.

प्रतिक्रिया

साक्री ग्रामीण रुग्णालयात नॉर्मल प्रसूतीसोबतच सिझेरियनची देखील व्यवस्था आहे. त्यासाठी आवश्यक सर्व सुविधा व रक्ताची उपलब्धता आहे. नॉर्मल प्रसूती करण्यावर अधिक भर दिला जातो. कोरोना काळातही ग्रामीण रुग्णालयात प्रसूती सुरू होत्या. शस्त्रक्रिया करण्यात काही गुंतागुंत असेल तर मात्र वैद्यकीय महाविद्यालय किंवा जिल्हा रुग्णालयात रेफर करतो.

- डॉ. बी.पी. गोविल, वैद्यकीय अधीक्षक साक्री

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये - ५

महिलांना प्रसूतीसाठी रेफर केले - ०