शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना वाढला; सॅनिटायझर वापर मात्र घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST

धुळे : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, आठवडाभरापासून तीन आकडी रुग्णसंख्या आहे. त्या तुलनेत सॅनिटायझरची मागणी मात्र घटली आहे. ...

धुळे : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, आठवडाभरापासून तीन आकडी रुग्णसंख्या आहे. त्या तुलनेत सॅनिटायझरची मागणी मात्र घटली आहे. गेल्या वर्षी ८५ ते ९० टक्क्यांवर असलेली विक्री आता मात्र २५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सॅनिटायझरचा वापर मात्र खूप कमी झाला आहे. गेल्या वेळी कोरोना हा आजार सर्वांसाठी नवीन असल्याने सॅनिटायझरने हात स्वच्छ केले तरच आपण सुरक्षित राहू, अशी समजूत सर्वसामान्यांची झाली होती. त्यामुळे घरातदेखील सॅनिटायझरचा वापर झाला. परंतु, वर्षभरात झालेल्या जाहिरातींमुळे आणि जनजागृतीमुळे हात स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर वाढला. त्यामुळे सॅनिटायझरला मागणी घटली आहे.

कामानिमित्त बाहेर फिरणारे सर्वच जण सॅनिटायझरचा वापर करताना दिसत नाहीत. काहींना सॅनिटायझर आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, तर काहींनी कोरोनाला गांभीर्याने घेणे बंद केले आहे. बेफिकिरी वाढली आहे. त्यामुळे देखील विक्री कमी झाली.

७५ टक्के विक्री घटली

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला त्यावेळी सॅनिटायझरला मोठ्या प्रमाणात मागणी होती. आता ती २५ टक्क्यांवर आली आहे. तब्बल ७५ टक्के विक्री घटली आहे.

गेल्या वेळी घराघरांत सॅनिटायझरचा वापर वाढला होता. परंतु, साबणाने हात स्वच्छ करता येतात अशी जनजागृती झाली. त्यामुळेदेखील सॅनिटायझरला मागणी घटली आहे.

मेडिकल दुकानातच नव्हे, तर इतर व्यावसायिकांनीदेखील सॅनिटायझरची लहान दुकाने रस्त्यावर सुरू केली होती. यंदा मात्र त्यांचा व्यवसाय ठप्प झाल्यासारखा आहे.

दिवाळीपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. काळजी घेणे टाळले जात आहे. त्यामुळेदेखील सॅनिटायझरची मागणी घटली.

साबणानेदेखील हात स्वच्छ होतात अशी जनजागृती झाली. बेफिकिरी वाढली. काहींना पैशांची अडचण आहे. नियमित वापरामुळे त्वचेवर परिणाम होतो असे काहींना वाटते. त्यामुळे सॅनिटायझरची विक्री केवळ २५ टक्क्यांवर आली आहे.

- विजय चाैधरी, अध्यक्ष, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ करतो. सॅनिटायझरचा वापर आता फारसा करीत नाही.

- राजेंद्र पाटील,

साक्री रोड, धुळे

घरात राहणारे सर्वजण साबणाने हात स्वच्छ करतात. मी देखील साबणाचा वापर करतो. परंतु, बाहेर गेल्यावर मात्र सॅनिटायझरचा वापर करतो.

- डॉ. इंद्रजित गंभिरे,

तालुका वैद्यकीय अधिकारी