शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

दणकेबाज लग्नाला आता ५० हजारांचा दंड जिल्हाधिकारी : फक्त २५ वऱ्हाडींसह दोन तासांत लग्न लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST

नवीन आदेशानुसार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर सरकारी कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के किंवा पाच कर्मचारी उपस्थित असतील. जीवनावश्यक सेवांसाठी ...

नवीन आदेशानुसार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर सरकारी कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के किंवा पाच कर्मचारी उपस्थित असतील.

जीवनावश्यक सेवांसाठी लागणाऱ्या कामकाजासाठी किमान कर्मचारी संख्येत काम करावे आणि कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती राहणार याची दक्षता घ्यावी. अत्यावश्यक सेवा प्रत्यक्ष पुरविण्यासाठी नेमण्यात आलेल्या मनुष्यबळासंदर्भात किमान मनुष्यबळ वापरावे; पण हे मनुष्यबळ शंभर टक्क्यांपर्यंतही वाढविण्याची मुभा राहील.

लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांच्या हातावर शिक्का

खाजगी प्रवासी वाहतुकीसाठी जिल्हाबंदी केली आहे. त्यांना केवळ ५० टक्के क्षमतेने वाहतूक करावी लागणार आहे. अन्यथा १० हजारांचा दंड आकारला जाईल.

खाजगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस गृहविलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल आणि हे शिक्के मारायचे काम बस कंपनीने करावयाचे आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक ५० टक्के क्षमतेने करण्याचे आदेश आहेत; परंतु उभे राहून प्रवास करण्यास निर्बंध राहील.

लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.