शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

‘नागरित्व सुधारणा कायदा’ हा एकाही भारतीयाच्या विरोधात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 22:56 IST

आमदार टी़ राजासिंह : धुळ्यातील हिंदू सभेत व्यक्त केले विचार, हिंदू बांधवांची उपस्थिती

धुळे : ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ एकाही भारतीयाच्या विरोधात नाही़ या कायद्याच्या अनुषंगाने भारतातील सर्वजण एकत्र येत आहेत़, असे प्रतिपादन हैद्राबाद येथील भाग्यनगरचे आमदार तथा गोरक्षक टी़ राजासिंह यांनी धुळ्यातील हिंदू सभेत व्यक्त केला़मालेगाव रोडवरील अग्रसेन चौकात असलेल्या गिंदोडिया मैदानावर हिंदू जनजागृती समितीच्यावतीने आयोजित केलेल्या हिंदू राष्ट्र जागृती सभेत आमदार टी़ राजासिंह बोलत होते़ व्यासपीठावर हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, सनातनचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्या क्षिप्रा जुवेकर आदी उपस्थित होते़आमदार टी़ राजासिंह म्हणाले, कायद्याला विरोध करतानाही संविधानिक मार्गाने न करता जाळपोळ व साधन संपत्तीचे नुकसान केले जात आहे़ हे जाणिवपूर्वक केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला़ राज्यात गोहत्या बंदी कायदा असतानाही अवैध कत्तलखाने सुरु आहेत़ गोमातेच्या रक्षणासाठी सिध्द व्हावे असेही त्यांनी सांगितले़राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले, कायद्याविरोधात आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या बहुसंख्य जणांना त्याबाबत अधिक माहिती नाही अपप्रचार करुन संभ्रम निर्माण केला जात आहे.सद्गुरु नंदकुमार जाधव म्हणाले, एकीकडे आपण श्रीराम मंदिराचे निर्माण करण्याची मागणी करत असताना सरकारी अधिग्रहीत मंदिरात चालू असलेल्या लुटीकडे आणि धर्माच्या विध्वसाकडे आपण दुर्लक्ष करणार का? आपल्या श्रध्दास्थानांचे रक्षण करण्याचा संकल्प आपणच केला पाहिजे. समाजाला या दृष्टीने जागृत केले पाहिजे. गोमाता, मंदिरे आणि धर्मशास्त्र यांच्या रक्षणासाठी आपण शिवरायांचा आदर्श ठेवायला हवा असेही आवाहन त्यांनी केले़क्षिप्रा जुवेकर म्हणाल्या, स्वत:चे रक्षण करण्याचा अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे़ महिलांकडे वक्रदृष्टीने पाहणाऱ्यांना धडा शिकविण्याचे बळ आपल्यामध्ये असायला हवे़ त्यासाठी स्वरक्षण करण्याचे प्रशिक्षण घ्यायला हवे़ त्यामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो़ केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्याही आपण सक्षम होतो़ स्वरक्षणासाठी महिलांनी प्रशिक्षण घ्यायला हवे, असेही त्या म्हणाल्या़ याप्रसंगी हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे