शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
3
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
4
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
6
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
7
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
8
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
9
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
10
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
11
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
12
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
13
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
14
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
15
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
16
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
17
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
18
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
19
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
20
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय टिकविण्याचे आव्हान!

By admin | Updated: April 24, 2017 16:45 IST

चारा टंचाई : मालपूर, सुराय, वैंदाणे, कर्ला, परसोळे आदी भागात चा:यासाठी पशुपालक शेतक:यांची भटकंती

 मालपूर,जि.धुळे,दि.24-  शिंदखेडा  तालुक्यातील मालपूरसह, सुराय, वैंदाणे, कर्ला व परसोळे आदी परिसरात सद्य:स्थितीत चारा टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी व पशुपालकांसमोर दुग्ध व्यवसाय टिकविण्याचे आव्हान आहे. रणरणत्या उन्हात चा:यासाठी बरेच फिरावे लागत असल्याने शेतकरी व पशुपालकांची चांगलीच दमछाक होत आहे.

मालपूर हे दुग्ध व्यवसायात जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे गाव आहे. शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय येथील बहुतांश शेतकरी करतात. यावर्षी कमी पाऊस झाल्याने  दोन्ही हंगामात शेतक:यांच्या पदरी निराशाच पडली. परिणामी, शेतीतून कुठलेही उत्पन्न मिळाले नाही. दुग्ध व्यवसायावर येथील अनेक पशुपालकांचा उदरनिर्वाह होत असतो. त्यामुळे दुष्काळात कुटुंबाला तारण्यासाठी दुधाचा धंदा उत्तम म्हणून अनेकांनी मालपूर गावात थांबूनच चा:याची शोध मोहीम सुरू केली आहे. 
चारा साठवणुकीकडे भर 
दुग्ध व्यवसायात हिरवा व कोरडा चारा मुबलक प्रमाणात लागतो. यासाठी मात्र, मोठी शोध मोहीम येथील शेतक:यांना करावी लागत आहे. चारा टंचाईमुळे काही शेतकरी त्यांचा शेतात बाहेरून चारा आणून साठवणूक करताना दिसत आहेत. शहादा, नंदुरबार, अक्कलकुवा, धुळे येथील सदन शेतकरी चारा विक्रीसाठी येत असतात. मात्र, ते दररोज येतील, याची शास्वती नसल्यामुळे  अनेक जण चारा साठवणुकीवर भर देत आहेत.सद्य:स्थितीत गावात मका पिकाचा चारा विक्रीसाठी दाखल होत असून तोदेखील पुरत नसल्याने येथील पशुपालक शेतकरी अडचणीत सापडला आहे. 
सकस चा:यासाठी धावपळ 
कोरडा व हिरवा असा दोन्ही प्रकारचा चारा योग्य प्रमाणात  गायी व म्हशींना दिला तर त्यांच्या पासून मिळणा:या दूधात फॅट चांगला मिळत असतो.  या फॅटवरच दूधाचा भाव अवलंबून असतो. परंतु, सकस चारा मिळविण्यासाठी येथील शेतक:यांना बरीच धावपळ करावी लागत आहे. 
पशुधन कमी होण्याच्या मार्गावर 
चा:या अभावी मालपूरसह परिसरात पशूधन कमी होण्याच्या मार्गावर आले आहे. पावसाळ्यात पाळीव प्राणी सहज पोसले जातात. परंतु, उन्हाळ्यात जनावरांना पोसणे शेतक:यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. दरम्यान, चारा नसल्याने दुधाच्या प्रमाणातही घट झाली आहे. येथील बहुतांश शेतकरी कापूस, कांदा, मिरची आदी नगदी पिके मोठय़ा प्रमाणावर घेत असल्यामुळे चा:यासाठी येथील शेतक:यांना भटकंती करावी लागते. 
चारा छावण्या सुरू कराव्यात 
मालपूर येथील दुग्ध व्यवसायाला अधिक चालना व प्रेरणा मिळण्यासाठी दानशूर व्यक्तींनी चारा छावण्या सुरू कराव्यात, गो-सेवकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथील शेतकरी व पशुपालकांनी केली आहे.