फागणे येथे बस चालकाची आत्महत्या

By Admin | Updated: April 16, 2017 16:36 IST2017-04-16T16:36:41+5:302017-04-16T16:36:41+5:30

फागणे येथे बस चालकाने जिन्याच्या गेटला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आह़े

Bus driver suicide at Phagate | फागणे येथे बस चालकाची आत्महत्या

फागणे येथे बस चालकाची आत्महत्या

 धुळे,दि.16- : तालुक्यातील फागणे येथे बस चालकाने जिन्याच्या गेटला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आह़े ही  घटना रविवारी पहाटे उघडकीस आली़ 

रामचंद्र पितांबर पाटील (वय 42 रा़ फागणे) असे मयताचे नाव आह़े ते  धुळे येथे बस चालक म्हणून नोकरीला होत़े त्यांनी 16 एप्रिल रोजी पहाटे राहत्या घरी जिन्याच्या गेटला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला़ त्यांच्या पत्नीला पहाटे साडेपाच वाजता जाग आली तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल़े  त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषीत केल़े  
रामचंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आह़े त्यांनी बँकतून कर्ज घेतले होत़े त्याचा हप्ता ते नियमित भरले होत़े मात्र त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकेले नाही़ 

Web Title: Bus driver suicide at Phagate