बदनामीच्या कारणावरून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST2021-04-18T04:35:52+5:302021-04-18T04:35:52+5:30

महिलेची बदनामी करतो, असे सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीचे पडसाद हाणामारीत झाले. यावेळी लोखंडी पाइपाचा सर्रासपणे वापर करण्यात आला. ...

Beating one for the sake of notoriety | बदनामीच्या कारणावरून एकास मारहाण

बदनामीच्या कारणावरून एकास मारहाण

महिलेची बदनामी करतो, असे सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीचे पडसाद हाणामारीत झाले. यावेळी लोखंडी पाइपाचा सर्रासपणे वापर करण्यात आला. यात तरुणाच्या डोक्यासह दोन्ही हाताला दुखापत झाली. तरुणाची पत्नी त्यांना वाचविण्यासाठी पुढे आली असता, तिच्याही पाठीवर आणि डोक्याला मारहाण करण्यात आली. यात दोघांना दुखापत झाली. ही घटना धुळे तालुक्यातील वेल्हाणे गावात गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर जखमी अवस्थेत दोघा पती-पत्नींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी छोटू आनंदा पाटील (४२, रा.वेल्हाणे ता.धुळे) यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, बारकू भिकन मराठे, रामू भिकन मराठे, भिकन वन मराठे, शरद भिकन मराठे (सर्व रा. वेल्हाणे ता. धुळे) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास तालुका पोलीस करत आहे.

Web Title: Beating one for the sake of notoriety