पडक्या झोपडीतून 23 हजारांचा दारूसाठा जप्त

By Admin | Updated: April 17, 2017 13:45 IST2017-04-17T13:45:01+5:302017-04-17T13:45:01+5:30

पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

Around 23 thousand of ammunition was seized from the slum | पडक्या झोपडीतून 23 हजारांचा दारूसाठा जप्त

पडक्या झोपडीतून 23 हजारांचा दारूसाठा जप्त

धुळे, दि. 17 -  तालुक्यातील अकलाड गाव शिवारात शेतातील पडक्या झोपडीतून तालुका पोलिसांनी 23 हजार 260 रुपयांचा दारूसाठा जप्त केला आह़े  पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
पोलिसांनी अकलाड शिवारात छापा टाकला असता तेथे  गट क्रमांक 110 मधील शेतात पडक्या झोपडीत दारूसाठा आढलला़ पोलिसांनी विशाल संजय सूर्यवंशी (रा़ अकलाडे, मोराणे) याचा हस्तक दुला ठेला गुजरिया (रा़ सेंधवा जि़ बडवाणी व ह़मु. अकलाड) याला बिअरचा साठा विनापरवानगी चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगताना पकडल़े
तेथून 7 हजार 500 रुपये किमतीच्या खजुरा कंपनीच्या 650 मि़ली.च्या सीलबंद बिअरच्या 60 बाटल्या, 14 हजार 500 रुपयांच्या फोस्टर कंपनीच्या 116 बिअरच्या बाटल्या व 1 हजार 260 रुपयांच्या कांगारू कंपनीच्या बिअरच्या 12 बाटल्या असा एकूण 23 हजार 260 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आह़े

Web Title: Around 23 thousand of ammunition was seized from the slum