शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
2
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
3
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
4
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
5
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
6
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
7
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
10
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
12
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
13
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
14
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
16
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
17
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
18
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
19
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
20
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
Daily Top 2Weekly Top 5

सलून, ब्युटी पार्लरला परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 22:41 IST

संदीप बेडसे : जिल्हा प्रशासनाला सूचविले प्रतिबंधात्मक उपाय

धुळे : लॉकडाउनमध्ये जिल्ह्यात सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़ यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्याची विनंतीही त्यांनी प्रशासनाला केली आहे़कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह काही अटी आणि शर्ती लागु करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत़ सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने सरु ठेवता येतील, ग्राहकांना नंबर देण्यासाठी दुकानाच्या बाहेर नोंदवही ठेवण्यात येईल, ग्राहकाने रजिस्टरमध्ये नाव, पत्ता इत्यादी माहिती भरल्यानंतर त्यांना नंबर देऊन दुकानात येण्याची वेळ सांगण्यात येईल, एका वेळी केवळ एकाच ग्राहकाला दुकानात प्रवेश मिळेल व दुकानात ग्राहक आणि कारागीर असे दोघेच असतील याची काळजी घेतली जाईल. सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये दोन खुर्च्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवून एकापेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात प्रवेश देता येवू शकतो, कारागीर आणि ग्राहक दोघांनीही मास्क वापरणे बंधनकारक आहे, मास्कची सक्ती करण्यात यावी, दुकानातील औजारे आणि साहित्याचे वारंवार निजंर्तुकीकरण करणे आवश्यक राहील, एका ग्राहकासाठी वापरलेला टॉवेल दुसºया ग्राहकासाठी वापरु नयेत असे प्रतिबंधात्मक उपाय संदीप बेडसे यांनी प्रशासनाला सूचविले आहेत़प्रत्येक गावात नाभिक व्यवसाय करणारे समाजबांधव आहेत़ अडीच महिन्यांपासून सर्व व्यवसायिक आणि कारागीरांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे़ अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून सलून व्यवसाय बंद असल्याने नाभिक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत़ त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन ३१ रोजी संपणार असून त्यांनी आणखी पाचव्या टप्प्यातील लॉकडाउनचे संकेत शासनाने दिले आहेत़ स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेवून सलून व्यवसायाला परवानगी द्यावी अशी मागणी संघटनांनी यापूर्वीच केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे