राज्याचे अपर पोलीस महासंचालक दोन दिवसांच्या धुळे दौ:यावर

By Admin | Updated: March 17, 2017 00:09 IST2017-03-17T00:09:05+5:302017-03-17T00:09:05+5:30

राजेंद्र सिंग : आढावा घेणार, सोनगीर पोलीस ठाण्यालाही देणार भेट

The Additional Director General of the State, for two days Dhule Dewan | राज्याचे अपर पोलीस महासंचालक दोन दिवसांच्या धुळे दौ:यावर

राज्याचे अपर पोलीस महासंचालक दोन दिवसांच्या धुळे दौ:यावर

धुळे : राज्याचे अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग हे गुरुवारी सायंकाळी धुळ्यात दाखल झाल़े ते दोन दिवसांच्या दौ:यावर असून जिल्ह्यातील पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत़
अपर पोलीस महासंचालक सिंग हे 17 व 18 मार्च रोजी दोन दिवस धुळ्यात आहेत़ शुक्रवारी ते सकाळी पोलीस कवायत मैदानावर पोलीस परेडला हजेरी लावणार आहेत़
त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालयाची तपासणी करतील़ त्यात महत्त्वाच्या कागदपत्रांच्या तपासणीसह  बैठक घेऊन जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावादेखील घेणार आहेत़ तसेच 18 मार्च रोजी सोनगीर पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासणी करणार आह़े  दरम्यान, अपर पोलीस महासंचालक सिंग हे येण्यापूर्वीच त्यांची आठ ते दहा कर्मचा:यांची टीम दोन ते तीन दिवसांपूर्वीच धुळ्यात दाखल झालेली आह़े त्यांनी निरीक्षण, तपासणीला सुरुवातदेखील केलेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ 19 रोजी ते त्यांच्या टीमसह धुळ्यातून मुंबईकडे रवाना होणार आहेत़

कस्टडीची पाहणी करण्याची शक्यता
शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कस्टडीतील स्वच्छतागृहात दोन दिवसांपूर्वीच संशयित आरोपीने आत्महत्या केली आह़े त्यामुळे अपर पोलीस महासंचालक सिंग हे कस्टडीची पाहणी करून घटनेची माहिती घेण्याची शक्यता आह़े

Web Title: The Additional Director General of the State, for two days Dhule Dewan