शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८५ ग्रामपंचायतींमध्ये राेहयोचे एकही काम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST

धुळे : कोरोना, लाॅकडाऊन आणि ‘ब्रेक द चेन’च्या कठोर निर्बंधांमुळे बेरोजगारांची संख्या वाढली असताना जिल्ह्यातील ५५८ ग्रामपंचायतींपैकी ८५ ...

धुळे : कोरोना, लाॅकडाऊन आणि ‘ब्रेक द चेन’च्या कठोर निर्बंधांमुळे बेरोजगारांची संख्या वाढली असताना जिल्ह्यातील ५५८ ग्रामपंचायतींपैकी ८५ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेचे एकही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील मजुरांना रोजगार उपलब्ध झालेला नाही.

कठोर निर्बंधांमुळे रोजगार गेल्याने महानगरातील अनेक कुटुंबे आपापल्या गावाला परतली होती. उन्हाळ्यात शेतांमध्येही कामे नसल्याने या मजुरांना कामांची प्रतीक्षा होती. परंतु काम मिळाले नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.

जिल्ह्यात सध्या राेजगार हमी योजनेची ९९५ कामे सुरू असून, या कामांवर तीन हजार ९८६ मजुरांची उपस्थिती आहे. या कामांमध्ये घरकुल योजनेच्या कामांची संख्या सर्वाधिक आहे. जलसंधारणाची कामेदेखील हाती घेण्यात आली होती.

दरम्यान, आता शेतशिवारांमध्ये कामे उपलब्ध होणार असल्याने रोहयोच्या कामांची संख्या कमी होणार आहे.

हाताला काम नाही,

अन‌् ‘राेहयो’ही नाही !

कोरोनाकाळात हाताला काम नाही. काम शोधण्यासाठी बाहेरही पडता येत नव्हते. रोहयोची कामे सुरू झाली असती तर रोजगार मिळाला असता. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- विद्याबाई साळवे, मालपूर

काेरोनामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राेहयो विभागाने गावात कामे सुरू केली नसल्याने हाताला काम मिळाले नाही. उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. कामे सुरू करण्याची गरज आहे.

- भरत देवरे, म्हसदी

सरपंच काय म्हणतात..?

कोरोनाकाळात रोहयोची कामे सुरू करण्याची घोषणा शासनाने केली होती. तशी मागणी आम्हीदेखील केली होती. मात्र काम सुरू झाले नाही. त्यामुळे बेरोजगार झालेल्या मजुरांच्या हाताला काम मिळाले नाही. मजूर कामाच्या शोधात आहेत. त्यांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे. मजुरांना कामाची गरज आहे.

- मच्छिंद्र शिंदे, सरपंच, मालपूर

ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्याकरिता ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक विकास होणे गरजेचे आहे. यासाठी रोजगार असायला हवा. महाराष्ट्र रोजगार हमी योजनांची कामे करण्यावर भर देण्यात यावा. सिंचन विहीर, फळबाग लागवड योजना स्थानिक स्तरावर लवकरात लवकर सुरू करावी.

- शैलेजा देवरे, सरपंच, म्हसदी

कामे सुरू करणार

मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामे सुरू करण्याच्या सूचना सर्व विभागांना केल्या आहेत. मजुरांनी मागणी नोंदवावी. तशा सूचना विविध विभागांना दिल्या जातील.

- गाेविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी, रोहयो