शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

८ बेरोजगार युवक-युवती प्रशिक्षणासाठी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:28 IST

म्हसदी : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान

म्हसदी : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत साक्री तालुक्यातील चिंचखेडे येथील ८ बेरोजगार युवक-युवतींची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. या बेरोजगारांना नाशिक येथे प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले.चिंचखेडे या गावाची ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झाली असून गावासाठी मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक नेमला आहे. गावाचा ग्रामविकास आराखडा तयार झाला आहे. यात कृषी, आरोग्य, शेती, उपजीविका, शिक्षण, रोजगार इत्यादी बाबींवर कामे घेतली आहेत. याचाच एक भाग म्हणून गावातील अनुसूचित जाती, जमातीच्या मुला-मुलींना पंडित दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजनेतंर्गत प्रशिक्षण देऊन खाजगी क्षेत्रात नोकरी मिळवून देण्यासाठी गावातील ८ मुलांची तुकडी नाशिक येथील निसा सिक्युरिटी या नामांकित प्रशिक्षण केंद्रात ३ महिन्याच्या निवासी प्रशिक्षणास पाठविण्यात आली. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर नोकरी देखील मिळणार असल्याने ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामुळे आदिवासी कुटुंबांना आर्थिक हातभार लागणार आहे. या प्रशिक्षणास पंडित वाघ, आनंदा वाघ, आकाश मोरे, सुनील सोनवणे, नितीन वेंदे, जागृती मोरे, राधा वाघ, पूजा माळीच यांना प्रशिक्षणास पाठविण्यात आले. यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे शाखा अभियंता राजेंद्र कुकावलकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी चिंचखेडे गावाचे सरपंच अभिमन सोनवणे, उपसरपंच प्रमोद बेडसे, ग्रामसेवक भारत पाटील, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक नंदू जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

टॅग्स :Dhuleधुळे