शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

उपाशीपोटी मजुरांची ३०० किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 8:41 PM

गावातही कोणी प्रवेश देत नव्हते : आंबे व धवली गावातील प्रत्येकी ६ कष्टकऱ्यांची आपबीती

सुनील साळुंखेशिरपूर : तालुक्यातील आंबे येथील सहा मजुर रोजगारानिमित्त नगर जिल्ह्यातील अरूणगाव येथे गेले होते. मात्र २४ मार्च रोजी देशात लॉकडाऊन झाल्याने, काम बंद झाले. अरूणगावहून गावी येण्यासाठी कुठलेही वाहन नसल्याने, त्यांनी चक्क दोन दिवस उपाशीपोटी जवळपास ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करून गाव गाठले. एवढे करुनही गावातही त्यांना कोणी घुसू देत नव्हते़ त्यांना गाववेशीजवळच १४ दिवस थांबण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे़ ही आपबिती कथन केली आहे आंबे येथील सहा मजुरांनी.शिरपूर तालुक्यातील आदिवासी नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यातील कानाकोपºयात व शेजारील गुजरात राज्यात देखील मजुरीसाठी निघून जातात. यावर्षीही कित्येक मजूर बाहेरगावी गेलेत. कोरोनाच्या प्रभावाने नगर जिल्ह्यातून तीनशे किमीची उपाशीपोटी पायपीट करून आंबे येथील सहा मजूर घरी परतले. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील आंबे येथील सहा मजूर विजेचे खांब गाडण्याच्या कामासाठी नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अरूणगाव येथे कामाला गेले होते. दरम्यान कोरोना महामारीच्या विळख्यात कामच बंद पडले. काम नसल्याने त्यांची उपासमार सुरू झाली. त्याचवेळी ठेकेदारानेही त्यांना वाºयावर सोडले. शेवटी आंबे येथील सहा व मध्य प्रदेशातील धवली येथील सहा अशा बारा मजुरांनी पायीच घरी येण्याचा निर्णय घेतला. आणि तेथूनच सुरू झाली त्यांची नरकयातना.पायी प्रवासा दरम्यान त्यांना कोणत्याही गावाने गावात येवू दिले नाही. त्यामुळे त्यांच्या जेवणाबरोबरच पाणी मिळणेही मुश्किल झाले. रात्री ओसाड शेतात तास - दोन तास आराम करून पायी प्रवास सुरूच ठेवला. केवळ बिस्कीटच्या सहाºयावर जवळपास तीनशे किमीची पायपीट करत अखेर सांगवी गाठले.या मजुरांनी व्यक्त केली आपबीतीभारसिंग सरदार पावरा, बन्सीलाल नाना पावरा, सुमाºया नंदलाल पावरा, राधेशाम धरमसिंग पावरा, सुनिल नानला पावरा, कुमाºया गीला पावरा या मजुरांचा समावेश आहे़ आठ दिवसांपूर्वीच ते विजेचे खांब गाडण्याच्या कामासाठी नगरजिल्ह्यातील अरूणगाव पोहचले होते. जावून फक्त तीनच दिवस काम केल्यानंतर लगेच संचारबंदी लागली़ रात्री फक्त तास दोन तास झोपून दिवस रात्र एक करत ४ ते ५ दिवसांत पायी चालून त्यांनी घर गाठले. मार्गावरील गावात लोकांनी साधे पाणी पिण्यासाठी घुसू दिले नाही, त्यामुळे मार्गावर लागणारी शेत, वा मिळेल तिथे थांबून पाणी पीत होते़ जेवणाचे हाल झाले़ जेवण कुठेच मिळाले नाही त्यामुळे सोबत घेतलेले बिस्कीट खाऊन दिवस काढलेत अशी आपबिती त्यांनी कथन केली़ सांगवी गावाजवळ आल्यानंतर सरपंच मुकेश पावरा यांनी वाहनातून घरी सोडले़

टॅग्स :Dhuleधुळे