शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांना ३ दिवसांचा ‘अल्टिमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:58 IST

धुळे शहर वाहतूक शाखा : फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश हॉर्न तात्काळ बदला

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कर्कश हॉर्नसह फॅन्सी नंबर प्लेट वाहनधारकांनी तीन दिवसांच्या आत बदल करुन घ्यावेत़ यावर तातडीने अंमलबजावणी करावी़ अन्यथा, संबंधित वाहनधारकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल़ अशा इशारा शहर वाहतूक शाखेच्यावतीने पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे यांनी दिलेला आहे़ शहरासह जिल्ह्यातील बहुतेक बुलेट मोटारसायकलीच्या चालक आणि मालकांनी सायलन्सरमध्ये बदल केलेले आढळून आलेले आहे़ याशिवाय काही मोटारसायकल चालकांनी वाहनावरील नंबरप्लेट या नियमानुसार न बसविता फॅन्सी पध्दतीने त्या बसविलेल्या आहेत़ पाहणी दरम्यान हा प्रकार समोर आलेला आहे़ फॅन्सी नंबर प्लेटमध्ये प्रामुख्याने बाबा, काका, मामा, दादा वगैरे यांचा समावेश आहे़ या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेच्यावतीने अशा वाहनधारकांना सुचित करत तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत़ ज्यांनी आपल्या मोटारसायकलला फॅन्सी पध्दतीने नंबर प्लेट बसविलेल्या असतील किंवा मोटारसायकलीच्या हॅण्डलला, सायलन्सरमध्ये अवैधरित्या बदल केलेला असेल अशा मोटारसायकल चालकांवर शहर वाहतूक शाखेमार्फत सक्तीने कारवाई करण्यात येणार आहे़ फॅन्सी नंबर प्लेटसाठी १ हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे़ तसेच मोटारसायकलीच्या सायलेन्सरमध्ये अथवा हॅण्डलमध्ये बदल केल्यास २ हजार २०० रुपये पर्यंत दंडाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे़ त्याची काटेकोरपणे अंंमलबजावणी करण्यात येणार आहे़ या अनुषंगाने तीन दिवसांच्या आत वाहनांची नंबरप्लेट आणि सायलन्सर नियमानुसार करुन घ्यावे़  अन्यथा होणार दंडात्मक कारवाईसंबंधित वाहनधारकांना तीन दिवस पुर्वीच सूचित करण्यात आलेले आहे़ त्याअनुषंगाने गांभिर्याने अंमलबजावणी करत वाहनाची फॅन्सी नंबर प्लेट बदलून घेणे आणि मोटारसायकलीचे सायलन्सर नियमाप्रमाणे बसवून घ्यावे़ अन्यथा, संबंधितांकडून दंड वसूल करण्यात येईल, अशी तंबी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिलेली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी