मृतांच्या नातेवाइकांना राज्य शासनाचे २ लाख

By Admin | Updated: May 5, 2014 20:47 IST2014-05-05T20:27:36+5:302014-05-05T20:47:58+5:30

दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी झालेल्या अपघातातील प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपये तसेच गंभीर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा

2 lakhs of state government's relatives | मृतांच्या नातेवाइकांना राज्य शासनाचे २ लाख

मृतांच्या नातेवाइकांना राज्य शासनाचे २ लाख

Update
रेल्वे अपघात : अपघातस्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
मुंबई : दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी झालेल्या अपघातातील प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपये तसेच गंभीर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केली.
मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दुपारी रोहा येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर रोवाली येथे अपघातस्थळाची पाहणी केली. ज्येष्ठ रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा केली. अपघातातील सर्व जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे, कोकणचे विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार उपस्थित होते.
सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात आणि जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची विचारपूस मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री जातीने केली. यावेळी त्यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण सोबत होत्या. (विशेष प्रतिनिधी)
------------------------------------------------------------------------
या अपघाताची चौकशी कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टीतर्फे करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे, कोकण रेल्वेचा समन्वय अधिक वाढावा म्हणून राज्य सरकार पुढाकार घेणार.
प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक नागरिक वेळीच धाऊन गेल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा.
रेल्वे सुरक्षेबाबत तातडीने पावले उचलण्यासाठी मुख्यमंत्री रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार.
-----------------------------------------------------------------------

Web Title: 2 lakhs of state government's relatives