शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार ठेवीदारांची १० कोटीत फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:18 IST

धुळे जिल्हा : सहा जणांविरुध्द गुन्हा

धुळे : आकर्षक व्याजदर, विविध प्रेक्षणीय स्थळी सहल आणि सोने-चांदी देण्याचे आमिष दाखवत १ हजार ४६१ ठेवीदारांची १० कोटी २९ लाख ४१ हजार ९५६ रुपयांची आर्थिक फसवणूक झाली़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात सहा संशयितांविरुध्द सोमवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला़धुळे तालुक्यातील शिरुड येथे उज्ज्वलम अ‍ॅग्रो मल्टीस्टेट को आॅपरेटीव्ह सोसायटी प्रा़ लि़ नाशिक आणि माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को आॅपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड कार्यालय स्थापन करण्यात आले होते़ या ठिकाणी आॅक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१९ या कालावधीत १ हजार ४६१ ठेवीदारांनी आपल्या वेगवेगळ्या रक्कमेची गुंतवणूक या सोसायटीत केली होती़ त्यांना आकर्षक व्याजदर, विविध प्रेक्षणीय स्थळी सहल यासह सोने-चांदी देण्याचे आमिष दाखविण्यात आले़ को आॅपरेटीव्ह सोसायटीचे स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडून प्रसार करण्यात आला़ ठेवीदारांकडून रोखीने ठेवी स्विकारण्यात आल्या़ तालुक्यातील शिरुड येथे कार्यालय सुरु करुन अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले़ ठेवींची मुदत पूर्ण झाल्यावर सुध्दा ठेवीदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ केली जात होती़ पाठपुरावा करुनही त्याचा उपयोग होत नव्हता़ कार्यालय बंद करुन पसार झाल्याने संशय बळावला आणि फसवणूक झाल्याचे समोर आले़याप्रकरणी धुळे तालुक्यातील गोंदूर येथील किशोर चिंधू पाटील याने फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, विष्णू रामचंद्र भागवत (रा़ गवंडगाव ता़ येवला, जि़ नाशिक), प्रफुल्ल निस्ताने (मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक), अभिजीत येरुरकर (शिरुड कंपनीचे सचिव), सपना संदीप अमृतकर (शिरुड ता धुळे, शाखाचे मॅनेजर, हल्ली मुक्काम मेहूणबारे ता़ चाळीसगाव), भैय्यासाहेब यशवंत गुजेला (धुळे), भैय्या दिलीप अहिरे (धुळे) या संशयिताविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे घटनेचा तपास करीत आहेत़ याप्रकरणाची ग्रामीण भागात चर्चा आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी