वाऱ्यामुळे ज्वारीचे पीक झाले आडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:40+5:302021-02-08T04:28:40+5:30

चार गावांत केली पाणवठ्यांची उभारणी कळंब : तालुक्यातल खोंदला, सात्रा, पाथर्डी व आथर्डी या गावांत ‘गाव तिथे पाणवठा’ उपक्रमांतर्गत ...

The wind blew the sorghum crop horizontally | वाऱ्यामुळे ज्वारीचे पीक झाले आडवे

वाऱ्यामुळे ज्वारीचे पीक झाले आडवे

चार गावांत केली पाणवठ्यांची उभारणी

कळंब : तालुक्यातल खोंदला, सात्रा, पाथर्डी व आथर्डी या गावांत ‘गाव तिथे पाणवठा’ उपक्रमांतर्गत पाणवठ्याची उभारणी करण्यात आली. सात्रा येथे लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या संकल्पनेतून प्रशासनाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे ग्रामस्थांमधूनही स्वागत होत आहे.

हरिनाम सप्ताहाची लोहगावात सांगता

तुळजापूर : तालुक्यातील लोहगाव येथे शनिवारी काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. यानिमित्त गावात ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. माऊली मंदिरासमोर ह.भ.प. राम गायकवाड महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सप्ताहादरम्यान आयोजित कार्यक्रमांना लोहगावसह परिसरातील गावातून भाविकांनी हजेरी लावली होती.

श्रमदानातून स्वच्छता मोहीम

जेवळी : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे श्रमदानातून स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्मशानभूमीच्या भिंती परिसराचा काही भाग गवताने व्यापला होता. तसेच पालापाचोळा थर, काटेरी झुडपे वाढली होती. यासाठी माजी उपसपंच बंकट बेडगे, ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य संजय अंगुले, संजय माने, परमेश्वर कारले, अभिजित हासुरे, शिवाजी पालमपल्ले, तम्मा स्वामी आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: The wind blew the sorghum crop horizontally