नवीन पाईपलाईन, भूमिगत नाली कामाचे सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:54+5:302021-07-09T04:21:54+5:30

भूम : शहरात नवीन पाईपलाईन टाकणे तसेच भूमिगत (भुयारी) गटार तयार करण्याचे काम पालिकेच्यावतीने लवकरच हाती घेण्यात येणार आहे. ...

Survey of new pipeline, underground drain work started | नवीन पाईपलाईन, भूमिगत नाली कामाचे सर्वेक्षण सुरू

नवीन पाईपलाईन, भूमिगत नाली कामाचे सर्वेक्षण सुरू

भूम : शहरात नवीन पाईपलाईन टाकणे तसेच भूमिगत (भुयारी) गटार तयार करण्याचे काम पालिकेच्यावतीने लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती नगरपालिका गट नेते संजय गाढवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

पालिकेच्यावतीने नाशिक येथील कंपनीमार्फत हे सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. नगर पालिकेच्यावतीने यापूर्वी १९७४ साली शहरात अंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आली होती. ती सध्या कालबाह्य झाली आहे. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध असतानादेखील शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा करताना पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या काही भागात तात्पुरत्या पाईपलाईन टाकून व जुन्या पाईपलाईनच्या वेगवेगळ्या दुरुस्त्या करीत पाणीपुरवठा केला जातो. त्यातच कमी व्यासाच्या पाईपलाईन असल्यामुळे प्रत्येक गल्लीत वॉल्व्ह टाकून शहराच्या सर्व भागात मुबलक पाणीपुरवठा सुरू आहे.

दरम्यान, सध्याची पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्यामुळे भविष्यात पाणीपुरवठा करताना आडचणी येणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन व शहरातील नागरिकांना वेळेत व मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी उद्भव धरणातून शहरापर्यंत नवीन वाढीव जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे सर्वेक्षण सध्या सुरू असल्याची माहिती गाढवे यांनी दिली. या पाईपलाईनच्या कामासोबतच भूमिगत गटार बांधकामाचे सर्वेक्षण देखील करण्यात येत आहे. भूम शहर स्वच्छ ठेवण्यासाठी साफसफाईबाबत विशेष काम नगरपालिकेने आजपर्यंत केलेले आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे व शहरात साथ रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी पालिका सातत्याने काळजी घेतली आहे. भविष्यात भुयारी गटाराचे बांधकाम केल्यास आरोग्य व साथीच्या आजाराचा धोका राहणार नाही. यासाठी या कामाचे सर्वेक्षण सुरू असून, याच्या निधीसाठीही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे गाढवे यांनी सांगितले.

कोट......

नगर पालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध विकासकामे आपण पूर्णत्वाकडे नेली आहेत. तसेच नगरसेवक, शहरवासीयांनी सुचविलेली सर्व विकासकामे प्रशासनाकडे पाठपुरावा करून निधीसाठी येणाऱ्या अडचणींवर वेळोवेळी मात करून व नगरपालिका फंडातून केली आहेत. पाईपलाईन व भुयारी गटार बांधण्याचे सर्वेक्षण लवकरच पूर्ण करुन यासाठी सुवर्ण जयंती नागरी नगरोत्थान अभियानांतर्गत निधीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

- संजय गाढवे, गट नेते

080721\1826-img-20210708-wa0046.jpg

भूम फोटो नविन पाणीपुरवठा लाईन व भूमिगत ( भुयारी ) गटार या कामाचे सर्वेक्षण शहरात सुरु आसून याची पाहणी करताना नगर पालिका गटनेते संजय गाढवे सोबत सर्वेक्षण करणारे कर्मचारी आदी ( छाया देविदास माळी )

Web Title: Survey of new pipeline, underground drain work started