एमआयडीसी निर्मितीसाठी सुप्रिया सुळे यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:32+5:302021-07-09T04:21:32+5:30
निवेदनात म्हटले आहे, लोहारा तालुक्याचे एकूण मतदान ९५ हजार इतके असून, तालुक्याची लोकसंख्या १ लाख २५ हजार आहे. तालुक्यात ...

एमआयडीसी निर्मितीसाठी सुप्रिया सुळे यांना साकडे
निवेदनात म्हटले आहे, लोहारा तालुक्याचे एकूण मतदान ९५ हजार इतके असून, तालुक्याची लोकसंख्या १ लाख २५ हजार आहे. तालुक्यात जमिनीचे एकूण क्षेत्र ५४ हजार हेक्टर तर लागवडीयोग्य क्षेत्र ४८ हजार हेक्टर एवढे आहे. जमिनीचे क्षेत्र कमी असल्याने व लोकसंख्या जास्त असल्याने या तालुक्यातील नागरिकांना केवळ शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या धरण निर्मितीसाठी या तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. या तालुक्याचे दरडोई उत्पन्न व वार्षिक उत्पन्न हे अत्यंत कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी रोजगाराच्या सोयी उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. या अनुषंगाने नवीन एमआयडीसी उभारून बेरोजगारांची अडचण दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी खा. सुप्रियाताई सुळे यांनी राज्याच्या उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याशी तातडीने दूरध्वनीवरून चर्चा केली. तसेच या अनुषंगाने बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असल्याचे अनिल जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.