घरीच अभ्यास करुन महात्मा फुले, बाबासाहेबांना करा अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST2021-04-11T04:32:12+5:302021-04-11T04:32:12+5:30
जिल्ह्यात दर वर्षी महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी केली ...

घरीच अभ्यास करुन महात्मा फुले, बाबासाहेबांना करा अभिवादन
जिल्ह्यात दर वर्षी महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते. गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे जयंती घरीच राहून साजरी करण्यात आली होती. या वर्षीही कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे महामानवांची जयंती घरीच राहून साजरी करण्याबाबत विविध सामाजिक संघटना, प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले व १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सलग अठरा तास अभ्यास अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात
नागरिकांनी घरीच राहून सहभाग नोंदवून महामानवांना अभिवादन करावे, असे आवाहन प्रबुद्ध इंजिनिअर ग्रुप व क्रांतीवीर दत्तोबा भोसले प्रतिभा प्रतिष्ठान
यांनी केले आहे.