शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सोनारी येये आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:35 IST

सोनारी : जिल्हा परिषदेकडून ‘स्मार्ट गाव’ या योजनेचे नाव बदलून आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजना करण्यात आली ...

सोनारी : जिल्हा परिषदेकडून ‘स्मार्ट गाव’ या योजनेचे नाव बदलून आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजना करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ‘तालुका स्मार्ट ग्राम’ पुरस्कारासाठी परंडा तालुक्यातील सोनारी या गावाची निवड करण्यात आली असून, या अनुषंगाने बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी येथे भेट देऊन आढावा बैठक घेतली.

गुप्ता यांनी या भेटीदरम्यान जि. प. शाळा, ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. तसेच भैरवनाथ मंदिर, भैरवनाथ गुरु गादी मठ, गावाबाहेर असलेल्या पुरातन लहूबाई तीर्थकुंड व तेथे चालू असलेल्या मंदिर व सभामंडप बांधकामाला भेट दिली. यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीन वर्षापासून चालू असलेल्या कामाची देखील पाहणी करण्यात आली. सन २०२०-२१ सुंदर गाव योजनेत ८१ गुण प्राप्त करून परंडा तालुक्यातून सोनारी गावाने पहिला क्रमांक मिळविला आहे. या सुंदरगाव पुरस्काराने सोनारी गावाला दहा लाखांचे बक्षीस देखील मिळणार आहे. या माध्यमातून गावाच्या विकासासाठी तसेच विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांसाठी २६४ वैयक्तिक लाभाची कामे करता येणार आहेत.

यावेळी जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी केंद्रे, कार्यकारी अभियंता नितीन भोसले, जिल्हा कृषी अधिकारी तीर्थकर, कार्यकारी अभियंता देवकर, प्रभारी गटविकास अधिकारी बी. आर. ढवळशंख, विस्ताराधिकारी ए. सी. कावळे, उप अभियंता लांडे, उपअभियंता शिंदे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, सरपंच दीपक दुबळे, उपसरपंच परमेश्वर मांडवे, ग्रामसेवक मदने, ग्रा. पं. सदस्य, जि. प. शाळेचे शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट...

नागरिकांमध्ये जनजागृती करा

सुंदरगाव योजनेत गावाची निवड झाल्याने मनरेगामधून फळबाग लागवड, गाय गोठा, कुक्कुटपालन अशाप्रकारे एकूण २६४ वैयक्तिक लाभाची कामे करता येणार आहेत. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक यांनी गावातील नागरिकांमध्ये योजनेची जनजागृती करुन वैयक्तिक लाभासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी बैठकीदरम्यान दिले.

निधीची मागणी

भैरवनाथ मंदिर ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र असल्याने मंदिर परिसर व गावातील विविध ठिकाणी विकास कामे व सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात निधी उपलब्ध करण्याची मागणी जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे बैठकीदरम्यान केली.