तडवळा-रूई रस्त्याला झुडपांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST2021-07-15T04:22:46+5:302021-07-15T04:22:46+5:30
कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे ते रूई (ढोकी) या जवळपास ३ किमी दरम्यानच्या रस्त्याला दोन्ही बाजूंनी ...

तडवळा-रूई रस्त्याला झुडपांचा विळखा
कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे ते रूई (ढोकी) या जवळपास ३ किमी दरम्यानच्या रस्त्याला दोन्ही बाजूंनी काटेरी झाडांनी विळखा घातला आहे. त्यामुळे रस्ता झाला अरूंद झाला असून, यातून अपघाताचा धोका वाढला आहे.
कसबे तडवळे ते रूई (ढोकी) या रस्त्यावर अगोदरच मोठी वळणे आहेत. शिवाय, अगदी वळणाच्या ठिकाणी झुडपे वाढल्याने समोरून आलेले वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघात होत आहेत. तडवळ्यावरून-उस्मानाबादला जाण्यासाठी रुई (ढोकी) मार्गे अंतर जवळ पडते. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, दुचाकी वरून जाताना एखादे वाहन समोरून येऊन बाजूने गेल्यास दुचाकी चालकास काटेरी झुडपे ओरबाडले जात आहेत. रस्ता अरूंद, त्यातच साईडपट्ट्यांचा अभाव असल्याने या मार्गावर छोटे-मोठे अपघात नेहमीच घडत आहेत. यात काहीजण जखमी झाले असून, वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन धोकादायक ठरणारी झुडपे त्वरित काढावीत, अशी मागणी होत आहे.
130721\581620210712_092703.jpg
तडवळा - रूई दरम्यान मार्गावरील काटेरी झुडपे