शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल, आपत्तीचे शर्थीचे प्रयत्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST

डेअरिंग जीवावर बेततेय... पावसाळ्यात अनेक ठिकाणी कमी उंचीचे पूल असल्याने त्यावरून पाणी वाहते. मात्र, नागरिक गाव, घर जवळ करण्याच्या ...

डेअरिंग जीवावर बेततेय...

पावसाळ्यात अनेक ठिकाणी कमी उंचीचे पूल असल्याने त्यावरून पाणी वाहते. मात्र, नागरिक गाव, घर जवळ करण्याच्या नादात प्रवाहाचा अंदाजच घेत नाहीत. पाण्याचा वेग, पुलाची स्थिती, त्यावरील खड्डे या बाबींमुळे वाहून जाण्याच्या घटना घडतात. यामुळे नागरिकांनी पुलावरून, रस्त्यावरून पाणी वाहत असताना त्यातून चालत किंवा वाहनावरून जाण्याचे धाडस करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लोकप्रतिनिधीही गेले धावून...

पाडोळी मंडळात झालेल्या दुर्घटनांची माहिती मिळाल्यानंतर खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच शेतीच्या नुकसानीची पाहणीही त्यांनी करीत प्रशासनास पंचनामे करण्याची सूचना केली. दरम्यान, आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही परिस्थितीची माहिती घेतली. भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या गावांना भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेतला.

शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव...

रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: पाडोळी मंडळात अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटले. ओढे, नाल्याचे पाणी शेतात शिरले. पिकांसह मातीही वाहून गेली. अजूनही अनेक ठिकाणी शेतीत पाणी थांबून आहे. या नुकसानीची माहिती देण्यासाठी समुद्रवाणी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. एकट्या या गावातील सुमारे ८५ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे त्यांनी प्रशासनास कळविले आहे.

नुकसानीचे अहवाल तातडीने द्या : जिल्हाधिकारी

पावसामुळे काही ठिकाणी शेतीचे बरेचसे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी कळविली आहे. या ठिकाणच्या नुकसानीची पाहणी करून तातडीने अहवाल द्यावेत, असे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेल्या दोघांचा शोध बचावपथकांद्वारे घेण्यात येत आहे. शोधकार्य सुरू असताना नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. मात्र, या गर्दीत धक्का बसून किंवा अन्य कारणाने दुसरी दुर्घटना संभवते. त्यामुळे नागरिकांनी शोधकार्याच्या ठिकाणी किंवा पाण्याजवळ गर्दी करू नये.

- कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी