शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

‘वीतभर’ परवान्यावर ‘हातभर’ उत्खनन; छत्रपती संभाजीनगर विभागात १८ टक्के महसूल ‘गळती’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:50 IST

मराठवाड्याच्या तिजोरीत १०९८ कोटींचे उद्दिष्ट; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी, तर नांदेड-लातूर पिछाडीवर.

- बाळासाहेब मानेधाराशिव : छत्रपती संभाजीनगर विभागाने गेल्या आर्थिक वर्षात १०९८ कोटींच्या उद्दिष्टापैकी ८१.६१ टक्के महसूल वसूल केला आहे. जमीन महसुलात धाराशिव जिल्ह्याने बाजी मारली असून, लातूर आणि नांदेडची कामगिरी खालावली आहे. दुसरीकडे, गौण खनिज क्षेत्रात परभणीने चांगली वसुली केली. मात्र, जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये प्रशासन सुस्त दिसले. दरम्यान, अनेक जिल्ह्यात ‘वीतभर’ जागेच्या परवान्यावर ‘हातभर’ उत्खनन केल्याने शासनाचा १८.३९ टक्के महसूल बुडाला आहे.

गत आर्थिक वर्षात छत्रपती संभाजीनगर विभागाला जमीन व गौण खनिज महसूल वसुलीचे १०९८ कोटी १२ लाखाचे उद्दिष्ट होते. ३१ मार्चपर्यंत ८९६ कोटी २३ लाख रुपये म्हणजेच ८१.६१ टक्के वसुली झाली आहे. यात जमीन महसुलाच्या २८६ कोटींच्या उद्दिष्टापैकी १४६ कोटी (५४.४९ टक्के) वसुली झाली. यामध्ये नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांची कामगिरी खालावली आहे. मात्र, धाराशिवने उल्लेखनीय काम केले. गौण खनिज महसुलात ८३० कोटींच्या उद्दिष्टापैकी ७५० कोटी म्हणजे ९०.३७ टक्के वसुली केली आहे.

जमीन महसुलात धाराशिवची आघाडीजमीन महसुलात दिलेल्या उद्दिष्टापैकी धाराशिव जिल्ह्याने सर्वाधिक ७४.९६ टक्के वसुली केली आहे. यामध्ये सर्वांत कमी नांदेड ३१.५६ टक्के, तर लातूर ४४.७८ टक्क्यांत आहेत.

गौण खनिज वसुली, परभणीचा ‘ओव्हरफ्लो’गौण खनिज उद्दिष्टाच्या तुलनेत परभणी जिल्ह्याने चांगली कामगिरी करत १४७.४६ टक्के वसुली केली आहे. गौण खनिज वसुलीत विभागातील इतर काही जिल्ह्यांनी उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली केली आहे, तर धाराशिव या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

जिल्हानिहाय उद्दिष्टे अन् वसुलीजिल्हा - जमीन महसूल उद्दिष्ट - वसुली - टक्के - गौण खनिज उद्दिष्ट - वसुली - टक्केछ.संभाजीनगर - ७२८५.९५ - ३८८६.९५ - ५३.३५ - १५०००.०० - ११०२३.८३ - ७३.४९जालना - २४१६.५७- १६८३.३३-६९.६६ -९०००.०० -६५४८.२१- ७२.७६

परभणी - १५३२.१०- ९६०.५८-६२.७०-९५००.००-१४००८.३५-१४७.४६हिंगोली - १३०९.७९-८४०.०८-६४.१४-६०००.००-५४२६.५६-९०.४४

नांदेड - ५००१.३८-१५७८.३०-३१.५६-१८०००.००-१६८७०.३४-९३.७२बीड - २८६८.५७-१९९८.२०-६९.६६-१३०००.००-९९९५.०२-७६.८८

लातूर - ३७५७.८८- १६८२.९२- ४४.७८-५५००.००-५७१४.६५-१०३.९०धाराशिव - २६४३.८०-१९८२.०२-७४.९७-७०००.००-५४२४.००-७७.४९

मायक्रो प्लॅनिंग केलीधाराशिव जिल्हा छोटा असताना मराठवाड्यात जमीन महसूल वसुलीत पहिल्या क्रमांकवर आहेत. एनए, सिलिंग जमिनीचे नियम बदलल्याने महसूल घटला. गौण खनिजातील तूट भरून काढण्यासाठी आगामी काळात मायक्रो प्लॅनिंग केली आहे.- विद्याचरण कडवकर, निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव.

English
हिंदी सारांश
Web Title : Illegal Mining Costs Revenue in Chhatrapati Sambhajinagar Division

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar division missed revenue targets due to illegal mining. Dharashiv excelled in land revenue, while Parbhani overachieved in minor minerals. Lax administration led to significant revenue loss across Jalna, Beed and Sambhajinagar.
टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागdharashivधाराशिव