शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीच्या सभेत ‘बीडीओं’ परत पाठविण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST

कळंब - येथील पंचायत समितीची शुक्रवारी पार पडलेली मासिक सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. यावेळी अधिकारी, कर्मचारी यांच्या कामकाजासंदर्भात ...

कळंब - येथील पंचायत समितीची शुक्रवारी पार पडलेली मासिक सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. यावेळी अधिकारी, कर्मचारी यांच्या कामकाजासंदर्भात सत्ताधारी शिवसेनेचे सदस्यच आक्रमक झाले होते. यानंतर उपस्थित १२ सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठविण्याच्या ठरावाला मंजुरी दिली व सभागृहातून वाॅकआऊट केले.

कळंब पंचायत समितीची शुक्रवारी मासिक सर्वसाधारण सभा होती. यामध्ये इतिवृत्त व शासन परिपत्रकांचे वाचन, उपकर योजना खर्च आढावा, उपकर योजनेच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, पंचायत समितीस्तर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाचे नियोजन, नोंदवह्या मान्यता, महाग्रारोहयो लेबर बजेटला मंजुरी देणे आदी विषय बैठकीच्या अजेंड्यावर होते. सभापती संगीता वाघे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी पंचायत समिती सभागृहात सुरू झालेल्या बैठकीस उपसभापती गुणवंत पवार, माजी उपसभापती भगवान ओव्हाळ, गटविकास अधिकारी एन. पी. राजगुरू, बांधकाम उपविभागीय अभियंता संजय कोरडे, एबीडीओ कुसनेन्नीवार यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

मासिक सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरील विषय झाल्यावर अचानक बैठकीचा नूर पालटला. सत्ताधारी शिवसेनेचे गटनेते रामहरी मुंडे यांनी ऐनवेळच्या विषयात पंचायत समितीमध्ये अधिकारी, कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत, यातून सदस्यही सुटत नाहीत, असा गंभीर आरोप केल्याने वातावरण तापले. रामहरी मुंडे यांच्या आरोपानंतर या विषयावर बोलतं होत आपल्याला विश्वासात घेतले जात नाही. कामे होत नाहीत, असा सूर सर्वच सदस्यांनी आळवला. यामुळे काही क्षण सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. अधिकारी सदस्यांचे म्हणणे धुडकावून लावत होते तर सदस्य आपल्या म्हणण्यावर ठाम होते. शेवटी रामहरी मुंडे यांनी गटविकास अधिकारी एन. पी. राजगुरू यांच्यावर अविश्वास व्यक्त करत शासनसेवेत परत पाठविण्याचा ठराव मांडला. यास उपसभापती गुणवंत पवार यांनी अनुमोदन दिल्यानंतर उपस्थित सर्व १२ सदस्यांनी या विषयाला मंजुरी दिली. यानंतर सदर ठराव वरिष्ठस्तरावर पाठवावा, असे सुचित करत सदस्य सभागृहातून बाहेर आले. यावेळी सभापती संगीता वाघे, उपसभापती गुणवंत पवार, भगवान ओव्हाळ, रामहरी मुंडे, प्रभावती आडसूळ, प्रशांत धोंगडे, राजेश्वर पाटील,रत्नदीप देशमुख, संगीता शिंदे, आत्मलिंग जटाळ, नीलावती कदम, वैशाली वाघमारे आदी सदस्य उपस्थित होते.

चौकट...

सत्ताधारीच हतबल होतात तेव्हा..

कळंब पंचायत समितीत सध्या शिवसेना, राष्ट्रवादी यांची सत्ता आहे. सभापती संगीता वाघे या शिवसेनेच्या तर उपसभापती गुणवंत पवार हे राष्ट्रवादीचे आहेत. असे असतानाही कामकाजावर होत असलेला परिणाम व सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने निर्माण झालेल्या असंतोषाला सत्ताधारी गटाच्या गटनेत्यांनी बाहेर काढले हे याठिकाणी विशेष आहे. यावर आता शिवसेनेचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उर्वरित विषय राहिले, सदस्यांचा सभात्याग

दरम्यान, बैठकीच्या अजेंड्यावरील विषय संपल्यानंतर आलेला पहिलाच ऐनवेळचा विषय वादळी ठरला. यात बीडीओ शासनसेवेत परत पाठविण्याचा व तोपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय झाला. यानंतर काही सदस्यांना ऐनवेळचे अन्य विषय मांडायचे होते. मात्र, तापलेल्या वातावरणात संतापलेले सदस्य उर्वरित विषय बाजूला ठेवत सभागृहातून बाहेर निघाले. सभात्यागामुळे बैठकीचा उत्तरार्ध तसा अपूर्णातच मोडला गेला.