निसर्गावर भरोसा ठेवत मशागतीची कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:34+5:302021-07-09T04:21:34+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव व परिसरात पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. दररोजच्या ढगाळ वातावरणामुळे आज ...

निसर्गावर भरोसा ठेवत मशागतीची कामे सुरू
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव व परिसरात पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. दररोजच्या ढगाळ वातावरणामुळे आज ना उद्या पाऊस पडेल, या आशेवर ढगाकडे पाहत शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग, तूर या खरीप हंगामातील पिकाच्या मशागतीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
पारगाव व परिसरात शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. परिसरातील एकूण पेरणीयोग्य असलेल्या क्षेत्राच्या ८५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. बाजारात बियाणाच्या किमती वाढल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी घरगुती बियाणाचा वापर केला. शेवटी योग्यवेळी पाऊस झाल्याने पेरणी यशस्वी होऊन उगवणही समाधानकारक आहे. मात्र, त्यानंतर पावसाने मोठा खंड दिला. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोवळे पीक तग धरून जोरात वाहणाऱ्या हवेच्या झोकात उभे आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी पिके सुकत होती. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ढगाकडे पाहत पिकाच्या शेतकऱ्यांनी मशागतीला सुरुवात केली आहे. दरम्यान, बुधवारी काही भागात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत आणखी पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
कोट.......
गेल्या आठवड्यात सोयाबीन कोळपणीला आलेले होते, मात्र, पावसाने उघडीप दिल्याने कोळपणी केल्यावर जमिनीतील ओल कमी होईल, या भीतीपोटी कोळपणीचे काम बंद ठेवले होते. गेल्या दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ झाले आहे. शिवाय काल काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडला असल्याने पाऊस येईल, या आशेवर कोळपणीच्या कामाला सुरुवात केली आहे.
- शिवाजी ताटे, शेतकरी
080721\img-20210708-wa0001.jpg~080721\img-20210708-wa0002.jpg
कडदोरा येथे उमेद व पं.स.उमरगा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यात सभापती सचिन पाटील, सरपंच सुनंदाताई रणखांब, उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे ,उपसरपंच खंडू बालकुंदे,तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप पाटील आदी मान्यवर
~कोळपणी 2