जुगार अड्ड्यावर छापा, एकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:30 IST2021-02-07T04:30:42+5:302021-02-07T04:30:42+5:30

५०० वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी ...

Raid on a gambling den, a crime against one | जुगार अड्ड्यावर छापा, एकाविरुद्ध गुन्हा

जुगार अड्ड्यावर छापा, एकाविरुद्ध गुन्हा

५०० वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील विविध मार्गावर वाहतूक नियम मोडणाऱ्या ५०० वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वाहनचालकांकडून १ लाख १८ हजार ९०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

हिंगळजवाडी येथील दारु अड्ड्यावर धाड

उस्मानाबाद : तालुक्यातील हिंगळजवाडी येथील एका दारु अड्ड्यावर ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने ५ फेब्रुवारी रोजी धाड टाकली. यात हिंगळजवाडी येथील ईश्वर काळे यांच्याजवळ ९ लिटर अवैध गावठी दारु आढळून आली. पोलिसांनी मद्य जप्त करुन संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद केला.

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कंटेकूर येथील खंडप्पा कंटेकुरे यांनी काही दिवसापूर्वी आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून, चौकशी सुरु आहे. स्कॉटलंड, लंडन येथील दिव्या शर्मा व बिल एडमंड या दोघांनी ८ ऑक्टोबर २०२० ते २९ जानेवारी २०२१ या कालावधीत खंडप्पा यांची ई-मेल व समाज माध्यमाद्वारे दिशाभूल करुन ४५ लाख ४२ हजार १०५ रुपयांची फसवणूक केल्याने निराश होऊन खंडप्पाने यांनी आत्महत्या केली. असे निवेदन मयताचा भाऊ विलास कंटेकुरे यांनी चौकशी दरम्यान पोलिसात दिले. यावरुन संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Raid on a gambling den, a crime against one