मुरुम : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शरण पाटील मित्र मंडळ व प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या वतीने शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्यां महिलांच्या कार्याचा गौरव तसेच मोफत ऑनलाईन लसीकरण नाव नोंदणी मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. प्रतिभा निकेतन विद्यालयाचे प्राचार्य पी. पी. गायकवाड अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्षा अनिता अंबर यांच्या हस्ते शैक्षणिक विभागातील महानंदा रोडगे, मंगल शिंदे, कस्तुरी जाधव, मनीषा कंटेकुरे, शाहीन तांबोळी, स्मिता सपाटे, अनिता छत्रे, पोतदार, कांबळे, यादव, पोलीस विभागातील पंढरी, मुजावर, पवार, वैद्यकीय विभागातील डॉ. शिंदे, क्रीडा विभागातील सोनाली पवार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उल्हास घुरघुरे ,काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ, मुरूम शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, शरण पाटील मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष राजू मुल्ला, मुरूम युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गौस शेख, उपाध्यक्ष शिवा दुर्गे, श्रीहरी शिंदे-पाटील, किरण गायकवाड, देवराज संगूळगे, प्रणित गायकवाड, प्रशांत मुरूमकर, उत्कर्ष गायकवाड, गौरीशंकर बोगंरगे, सूरज कांबळे, ओंकार शिंदे, माजिद बोरगावकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शीतल पाताळे यांनी केले तर आभार श्रीहरी शिंदे पाटील यांनी मानले.
मुरूममध्ये गौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:35 IST
मुरुम : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शरण पाटील मित्र मंडळ व प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या वतीने शहरात विविध क्षेत्रात ...
मुरूममध्ये गौरव सोहळा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}