पाचपिंपळ्यांची वीज २० दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:39+5:302021-07-09T04:21:39+5:30

गावातील गावठाण डीपी सतत जळत आहे. याबाबत तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ऐन पावसाळ्यात ...

Power outage for five days | पाचपिंपळ्यांची वीज २० दिवसांपासून बंद

पाचपिंपळ्यांची वीज २० दिवसांपासून बंद

गावातील गावठाण डीपी सतत जळत आहे. याबाबत तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे साथीच्या रोगाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. वीज नसल्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून, ग्रामस्थांना शेतशिवारात भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. त्यातच अशुद्ध पाणी पिण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तत्काळ नवीन डीपी बसून वीज पुरवठ्यातील त्रुटी आठ दिवसांत दूर कराव्यात, अन्यथा संभाजी ब्रिगेड तालुका शाखेच्या वतीने व पाचपिंपळा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे महावितरणला देण्यात आला आहे. विजेअभावी पिकांना पाणी देण्यात अडचण येत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख, तालुकाअध्यक्ष समाधान खुळे, कार्याध्यक्ष अमोल गोडगे, तालुका उपाध्यक्ष सुभाष ठोंगे, लक्ष्मण धुमाळ, रत्नाकर जाधव, रामा धुमाळ, अमोल खैरे, नवनाथ कातुरे, ओंकार खैरे, ज्ञानेश्वर खैरे यांच्या सह्या आहेत.

Web Title: Power outage for five days