पॉझिटिव्हीटी गेली २५ टक्क्यांपुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST2021-04-11T04:32:16+5:302021-04-11T04:32:16+5:30

एप्रिलच्या सुरुवातीपासूनच चाचण्यांची गती वाढविण्यात आली आहे. सुरुवातीस बाराशेच्या आसपास चाचण्या होत होत्या. आता त्या दोन हजारांपुढे जाऊन पोहोचल्या ...

Positivity has gone up by 25 per cent | पॉझिटिव्हीटी गेली २५ टक्क्यांपुढे

पॉझिटिव्हीटी गेली २५ टक्क्यांपुढे

एप्रिलच्या सुरुवातीपासूनच चाचण्यांची गती वाढविण्यात आली आहे. सुरुवातीस बाराशेच्या आसपास चाचण्या होत होत्या. आता त्या दोन हजारांपुढे जाऊन पोहोचल्या आहेत. १ एप्रिल रोजी एकूण १३१५ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील २८३ (२१.५२ टक्के) जण बाधित आढळले. २ एप्रिल रोजी एकूण १२६७ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील २९२ (२३.०४ टक्के) जण बाधित आढळले. ३ रोजी १५०८ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील ३४३ (२२.७४ टक्के) जण बाधित आढळले. ४ रोजी ९९५ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील २५२ (२५.३२ टक्के) जण बाधित आढळले. ५ रोजी १५०० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील ४२३ (२८.२ टक्के) जण बाधित आढळले. ६ रोजी १५०४ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील ४१५ (२७.५९ टक्के) जण बाधित आढळले. ७ रोजी २०४६ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील ४६८ (२२.८७ टक्के) जण बाधित आढळले. ८ रोजी २०१८ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील ४८९ (२४.२३ टक्के) जण बाधित आढळले. तर ९ एप्रिल रोजी २१०८ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यामधील ५६४ जण बाधित आढळून आले. याची टक्केवारी २६.७५ इतकी ािराहिली. आतापर्यंतचा जिल्ह्याचा सरासरी पॉझिटीव्हीटी रेट हा १८ टक्केच्या जवळपास आहे. मात्र, सध्याचा रेट वाढला आहे.

१० हजारांवर रॅपिड टेस्ट...

गेल्या ९ दिवसांमध्ये १० हजार ६४४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातून २ हजार ४६१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. बाधित आढळून येण्याचे प्रमाण हे २३.१२ टक्के इतके आहे.

आरटीपीसीआरही वाढल्या...

१ ते ९ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात चार हजारांच्या जवळपास आरटीपीसीआर टेस्ट झाल्या आहेत. त्यातील ३ हजार ६१७ टेस्टचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ८८ जण बाधित आढळून आले. हा पॉझिटीव्हीटी रेट २४.५५ टक्के इतका आहे.

शंकेला पुरेशी जागा नाही...

रॅपिड टेस्ट कीटद्वारे झालेल्या चाचण्यात रिपोर्ट हा पॉझिटिव्ह अधिक येत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. रॅपिडमध्ये पॉझिटीव्ह अन् आरटीपीसीआरमध्ये निगेटीव्ह, अशी मोजकी उदाहरणेही समोर आली होती. मात्र, एकूण चाचण्यांपैकी बाधित आढळून येण्याचे प्रमाण हे दोन्ही चाचण्यांचे जवळपास बरोबर आहे. गेल्या ९ दिवसांत झालेल्या रॅपिड टेस्टमधून २३.१२ टक्के रुग्ण आले. तर आरटीपीसीआरमध्ये हेच प्रमाण २४.५५ इतके आहे. त्यामुळे या शंकेला पुरेशी जागा राहिलेली दिसत नाही.

Web Title: Positivity has gone up by 25 per cent