शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण कल्याण समितीची लोहाऱ्यात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST

लोहारा : जिल्ह्यातील पहिली रुग्ण कल्याण समिती बैठक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोहारा ग्रामीण रुग्णालयात ...

लोहारा : जिल्ह्यातील पहिली रुग्ण कल्याण समिती बैठक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोहारा ग्रामीण रुग्णालयात पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, बालविकास प्रकल्प अधिकारी कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोविंद साठे, रुग्ण कल्याण समितीचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक किशोर गवळी, आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांनी विविध आरोग्य योजनेचा आढावा घेत रुग्णांशी संवाद साधला. कोरोना काळात रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा दिल्याबद्दल रुग्ण कल्याण समितीच्या वतीने डॉ. गोविंद साठे यांचा सत्कार करण्यात आला.

संदीप देशमुख यांचा सत्कार

(फोटो : संदीप देशमुख ०४)

उस्मानाबाद : येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. संदीप देशमुख यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान केली. याबद्दल प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, प्राचार्या डॉ. सुलभा देशमुख, प्राचार्य डॉ. कटारी, प्राचार्य डी. एच. पवार यांनी त्यांचा सत्कार केला. प्रा. देशमुख यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. धनंजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिंथेसिस ॲण्ड स्टडी ऑफ मेटल ॲण्ड नॉन मेटल डोपडं टायटॅनियम डायऑक्साइड नॅनोपार्टीकल्स’ या विषयावर संशोधन प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता.

वाशी येथे गुणवंतांचा सत्कार

(फोटो : मुकुंद चेडे ०४)

वाशी : येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची जयंती साजरी झाली. यावेळी उपस्थितांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब चेडे, तर प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, माजी उपनगराध्यक्ष प्रसाद जोशी, भाजपचे सुरेश कवडे, गौतम गायकवाड, नेताजी नलवडे, पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत, विशाल महामुनी, भास्करराव कवडे, वसंत कवडे, विलासराव देशमुख, ज्ञानेश्वर करडे, अमोल केळे, मुकुंद शिंगणापुरे, आदी उपस्थित होते. शेवटी जयंती निमित्त विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आली. एस. एस. धारकर, बी. डी. कांबळे, एस. बी. छबिले यांनी सूत्रसंचालन केले. पी. ए. कांबळे यांनी आभार मानले.