शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद ‘सीईओं’चे आदेश राज्यमंत्र्यांकडून रद्दबातल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : बदली प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात आला हाेता. याकरिता उपलब्ध करून दिलेल्या पाेर्टलवर माहिती ...

उस्मानाबाद : बदली प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात आला हाेता. याकरिता उपलब्ध करून दिलेल्या पाेर्टलवर माहिती भरणे बंधनकारक हाेते. मात्र, जिल्ह्यातील ५२ शिक्षकांनी पाेर्टलवर चुकीची माहिती भरून बदली करून घेतल्याचे समाेर आले हाेते. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येकी एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद केली हाेती. त्यांच्या या आदेशाविरुद्ध काही शिक्षकांनी थेट ग्रामविकास राज्यमंत्री यांच्याकडे धाव घेतली हाेती. सुनावणीअंती राज्यमंत्र्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश रद्दबातल ठरविले. तसेच बंद केलेली वेतनवाढ तातडीने सुरू करण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे गुरुजींना माेठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्वी खूपच वेळखाऊ हाेती. कितीही पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला तरी आराेप-प्रत्याराेप हाेत हाेते. अशा प्रकारांना फाटा देण्यासाठी तत्कालीन भाजप सरकारने गुरुजींच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला हाेता. बदलीस पात्र शिक्षकांना आपली माहिती ऑनलाईन भरता यावी, याकरिता स्वतंत्र पाेर्टल उपलब्ध करून देण्यात आले हाेते. त्यानुसार सुरुवातीच्या टप्प्यात शिक्षकांना आपली माहिती पाेर्टलवर दाखल करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी ठरावीक मुदतही दिली हाेती. त्यानुसार गुरुजींनी माहिती अपलाेड केली आणि अवघ्या एका क्लिकवर गुरुजींच्या हाती बदल्यांचे आदेश आहे. दरम्यान, यानंतर काही गुरुजींनी शिक्षण विभागाकडे आक्षेप नाेंदविले. काहींनी पाेर्टलवर चुकीची माहिती भरून बदलीचा लाभ घेतल्याचे त्यांचे म्हणणे हाेते. प्राप्त आक्षेपाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेत सुनावण्या झाल्या. त्यानुसार ज्यांच्या आक्षेपात सत्यता आढळून आली, त्यांच्याविरुद्ध जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारला. अशा शिक्षकांची संख्या सुमारे ५२ एवढी आहे. यांची प्रत्येकी एक वेतनवाढ बंद करण्यात आली. दरम्यान, पाेर्टलवर माहिती भरताना अनंत अडचणी आल्या. त्यामुळे वेळेत व व्यवस्थित माहिती भरता आली नाही, असा दावा करीत काही शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली हाेती. परंतु, त्यांनी संबंधित शिक्षकांची अपिले फेटाळली. यानंतर संबंधित शिक्षकांनी थेट राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री यांच्याकडे धाव घेतली. सीईओंनी केलेली कारवाई, अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे हाेते. सदरील प्रकरणात सुनावणी झाली असता, सीईओंचा आदेश रद्दबातल ठरविला. अपिल दाखल केेलेल्या संबंधित शिक्षकांची कायमस्वरूपी बंद केलेली वेतनवाढ पुन्हा सुरू करण्याचे निर्देशही दिले. त्यामुळे अपिलार्थी शिक्षकांना माेठा दिलासा मिळाला आहे.

चाैकट...

पाेर्टलवर माहिती भरताना शिक्षकांना अनंत अडचणी येत हाेत्या. परिणामी काही गुरुजींकडून माहिती भरताना चुका झाल्या. त्या हेतुपूर्वक केलेल्या नाहीत. जळगाव जिल्हा परिषदेने यापूर्वीच शिक्षकांच्या चुका क्षमापित केल्या आहेत; परंतु, आपल्या जिल्हा परिषदेने तसे केले नाही. परिणामी ग्रामविकास राज्यमंत्री यांच्याकडे अपील करावे लागले. सुनावणीअंती त्यांनी सीईओंचा आदेश रद्दबातल ठरविला आहे. त्यामुळे अपील केलेल्या शिक्षकांची वेतनवाढ पुन्हा सुरू हाेईल.

- कल्याण बेताळे, राज्य उपाध्यक्ष, प्राथमिक शिक्षण समिती.

सेवापुस्तकात घेणार नाेंद...

ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी सीईओंचे आदेश रद्दबातल ठरवितानाच बंद केलेली वेतनवाढ तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. एवढेच नाही तर या आदेशाची नाेंद संबंधित शिक्षकांच्या सेवापुस्तकात घेण्याबाबतही म्हटले आहे.