शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद ‘सीईओं’चे आदेश राज्यमंत्र्यांकडून रद्दबातल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:35 IST

गुरुजींना दिलासा-कायमस्वरूपी राेखलेली वेतनवाढ सुरू करण्याचे निर्देश : बाबूराव चव्हाण उस्मानाबाद - बदली प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी ऑनलाईन पद्धतीचा ...

गुरुजींना दिलासा-कायमस्वरूपी राेखलेली वेतनवाढ सुरू करण्याचे निर्देश : बाबूराव चव्हाण

उस्मानाबाद - बदली प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात आला हाेता. याकरिता उपलब्ध करून दिलेल्या पाेर्टलवर माहिती भरणे बंधनकारक हाेते. मात्र, जिल्ह्यातील ५२ शिक्षकांनी पाेर्टलवर चुकीची माहिती भरून बदली करून घेतल्याचे समाेर आले हाेते. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येकी एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद केली हाेती. त्यांच्या या आदेशाविरुद्ध काही शिक्षकांनी थेट ग्रामविकास राज्यमंत्री यांच्याकडे धाव घेतली हाेती. सुनावणीअंती राज्यमंत्र्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश रद्दबातल ठरविले, तसेच बंद केलेली वेतनवाढ तातडीने सुरू करण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे गुरुजींना माेठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्वी खूपच वेळखाऊ हाेती. कितीही पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला तरी आराेप-प्रत्याराेप हाेत हाेते. अशा प्रकारांना फाटा देण्यासाठी तत्कालीन भाजपा सरकारने गुरुजींच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला हाेता. बदलीस पात्र शिक्षकांना आपली माहिती ऑनलाईन भरता यावी, याकरिता स्वतंत्र पाेर्टल उपलब्ध करून देण्यात आले हाेते. त्यानुसार सुरुवातीच्या टप्प्यात शिक्षकांना आपली माहिती पाेर्टलवर दाखल करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी ठरावीक मुदतही दिली हाेती. त्यानुसार गुरुजींनी माहिती अपलाेड केली आणि अवघ्या एका क्लिकवर गुरूजींच्या हाती बदल्यांचे आदेश आहे. दरम्यान, यानंतर काही गुरुजींनी शिक्षण विभागाकडे आक्षेप नाेंदविले. काहींनी पाेर्टलवर चुकीची माहिती भरून बदलीचा लाभ घेतल्याचे त्यांचे म्हणणे हाेते. प्राप्त आक्षेपाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेत सुनावण्या झाल्या. त्यानुसार ज्यांच्या आक्षेपात सत्यता आढळून आली त्यांच्याविरूद्ध जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारला. अशा शिक्षकांची संख्या सुमारे ५२ एवढी आहे. यांची प्रत्येकी एक वेतनवाढ बंद करण्यात आली. दरम्यान, पाेर्टलवर माहिती भरताना अनंत अडचणी आल्या. त्यामुळे वेळेत व व्यवस्थित माहिती भरता आली नाही, असा दावा करीत काही शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली हाेती; परंतु त्यांनी संबंधित शिक्षकांची अपिले फेटाळली. यानंतर संबंधित शिक्षकांनी थेट राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री यांच्याकडे धाव घेतली. सीईओंनी केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे हाेते. या प्रकरणात सुनावणी झाली असता, सीईओंचा आदेश रद्दबातल ठरविला. अपील दाखल केेलेल्या संबंधित शिक्षकांची कायमस्वरूपी बंद केलेली वेतनवाढ पुन्हा सुरू करण्याचे निर्देशही दिले. त्यामुळे अपिलार्थी शिक्षकांना माेठा दिलासा मिळाला आहे.

चाैकट...

पाेर्टलवर माहिती भरताना शिक्षकांना अनंत अडचणी येत हाेत्या. परिणामी काही गुरुजींकडून माहिती भरताना चुका झाल्या. त्या हेतूपूर्वक केलेल्या नाहीत. जळगाव जिल्हा परिषदेने यापूर्वीच शिक्षकांच्या चुका क्षमापित केल्या आहेत; परंतु आपल्या जिल्हा परिषदेने तसे केले नाही. परिणामी ग्रामविकास राज्यमंत्री यांच्याकडे अपील करावे लागले. सुनावणीअंती त्यांनी सीईओंचा आदेश रद्दबातल ठरविला आहे. त्यामुळे अपील केलेल्या शिक्षकांची वेतनवाढ पुन्हा सुरू हाेईल.

-कल्याण बेताळे, राज्य उपाध्यक्ष, प्राथमिक शिक्षण समिती.

सेवा पुस्तकात घेणार नाेंद...

ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी सीईओंचे आदेश रद्दबातल ठरवितानाच बंद केलेली वेतनवाढ तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. एवढेच नाही तर या आदेशाची नाेंद संबंधित शिक्षकांच्या सेवा पुस्तकात घेण्याबाबतही म्हटले आहे.