चुकीच्या खाते क्रमांकामुळे निराधारांची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST2021-04-17T04:32:47+5:302021-04-17T04:32:47+5:30

कळंब तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, ...

Homelessness due to wrong account number | चुकीच्या खाते क्रमांकामुळे निराधारांची फरफट

चुकीच्या खाते क्रमांकामुळे निराधारांची फरफट

कळंब तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, आदी योजनांतून विधवा, निराधार, अपंग अशा घटकांना दरमहा आर्थिक मदत देण्यात येते. केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक साहाय्यातून ही मदत थेट बँक खात्यावर वितरित केली जाते.

कळंब शहरात असे अनेक लाभार्थी आहेत, त्यांना देय असलेली रक्कम अदा करण्याची कार्यवाही तहसील कार्यालयातील संबंधित विभाग पार पाडत असतो. मात्र, या विभागातून पुढे बँकांत पाठविण्यात आलेल्या काही लाभार्थ्यांच्या खातेक्रमांकात अकराऐवजी बारा अंक नमूद झाल्याने रक्कम मिळण्यात अडचण येत आहे. यामुळे त्या लाभार्थ्यांना बँकांत अकारण हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

या संदर्भात नायब तहसीलदार अस्लम जमादार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा प्रकार घडला असेल तर योग्य खाते क्रमांक नमूद करीत, तो बँकेत पाठविण्याच्या सूचना देण्यात येतील असे सांगितले.

Web Title: Homelessness due to wrong account number