काचेची बाटली डाेक्यात मारली, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST2021-07-16T04:23:28+5:302021-07-16T04:23:28+5:30

उस्मानाबाद : धक्का का दिला, म्हणून जाब विचारला असता, संतप्त हाेऊन एकाने हातातील काचेची बाटली डाेक्यात मारून संबंधितास जखमी ...

The glass bottle hit the dacoit, injuring one | काचेची बाटली डाेक्यात मारली, एक जखमी

काचेची बाटली डाेक्यात मारली, एक जखमी

उस्मानाबाद : धक्का का दिला, म्हणून जाब विचारला असता, संतप्त हाेऊन एकाने हातातील काचेची बाटली डाेक्यात मारून संबंधितास जखमी केले. ही घटना १३ जुलै राेजी तुळजापूर शहरात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील चैतन्य मारुती माने हे १३ जुलै राेजी विश्वनाथ काॅर्नर (तुळजापूर) येथे थांबले हाेते. यावेळी आशिष माेतीराम खंदारे (रा. तुळजापूर) यांचा माने यांना धक्का लागला. याबाबत जाब विचारला असता, संतप्त खंदारे याने माने यांना शिवीगाळ केली. याचे पर्यवसान मारहाणीत झाले. हातातील काचेची बाटली माने यांच्या डाेक्यात मारून जखमी केले. सदरील घटनेनंतर चैतन्य माने यांनी १४ जुलै राेजी तुळजापूर पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून खंदारे याच्याविरुद्ध भा.दं.सं.चे कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: The glass bottle hit the dacoit, injuring one