शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या १८९२ अंगणवाड्यांत पक्ष्यांसाठी ‘चारा-पाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST

उस्मानाबाद : निसर्गाचा कोप झाला तरी माणूस त्यातून मार्ग काढून आपले संरक्षण करून घेतो; परंतु, पशू-पक्ष्यांना कोपाला सामोरे जावे ...

उस्मानाबाद : निसर्गाचा कोप झाला तरी माणूस त्यातून मार्ग काढून आपले संरक्षण करून घेतो; परंतु, पशू-पक्ष्यांना कोपाला सामोरे जावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या सुमारे १ हजार ८९२ अंगणवाड्यांच्या आवारात पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची साेय करण्याचा उपक्रम महिला व बाल कल्याण विभागाकडून हाती घेण्यात आला आहे. सीईओ डाॅ. विजयकुमार फड यांनी अंगणवाड्यांना अचानक भेटी देऊन या उपक्रमाची पाहणी केली.

शेतातील रब्बीच्या पिकांची काढणी झाल्यानंतर कडक ऊन पडते. या रणरणत्या उन्हामुळे शेतशिवारातील जलस्रोतांच्या घशालाही काेरड पडते. परिणामी पक्ष्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनताे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाने पुढाकार घेत अंगणवाड्यांच्या माध्यमातून चिमुकल्यांना पाेषण आहार पुरविण्यासाेबतच अंगणवाडीच्या आवारात पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची साेय करण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी बळीराम निपाणीकर यांनी प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची बैठक घेऊ हा उपक्रम त्यांच्यासमाेर मांडला. अधिकारी तसेच अंगणवाडी स्तरावरील कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविण्याची ग्वाही दिली. यानंतर हे काम सुरू झाले. सध्या हा उपक्रम जवळपास १ हजार ८०० पेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये पाेहाेचला आहे. परिसरातील झाडांवर पक्ष्यांसाठी चारा तसेच पाण्याची साेय करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये खंड पडू नये, यासाठी संबंधित अंगणवाडीतील एका कर्मचाऱ्यावर जबाबदारी साेपविण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी अंगणवाडीस भेट देण्यासाठी गेल्यानंतर त्यांना या उपक्रमाची पाहणी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता अंगणवाडीच्या माध्यमातून चिमुकल्यांसाेबतच पक्ष्यांचेही पाेषण हाेणार आहे.

चाैकट...

‘सीईओं’नी दिल्या अचानक भेटी

महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून पक्ष्यांसाठी अंगणवाड्यांच्या आवारामध्ये चारा-पाण्याची साेय करण्यात आल्याचे समजल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी काही अंगणवाड्यांना अचानक भेटी दिल्या. यावेळी त्यांनी अंगणवाडीसाेबतच पक्ष्यांसाठी चारा-पाणी या उपक्रमाची पाहणी केली. हा उपक्रम अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पर्यवेक्षिका चांगल्या पद्धतीने राबवित असल्याचे समाेर आले.

काेट....

जिल्हाभरातील अंगणवाड्यांमध्ये पक्ष्यांसाठी चारा-पाणी हा उपक्रम हाती घेतला आहे. काही गावांतील अंगणवाड्यांना अचानक भेट देऊन पाहणी केली असता, ताे पूर्ण क्षमतेने राबविला जात असल्याचे दिसून आले. या उपक्रमात गावकऱ्यांनीही सहभाग नाेंदविल्यास अंमलबजावणी आणखी चांगली हाेईल.

-डाॅ. विजयकुमार फड, सीईओ, जिल्हा परिषद

काेट...

विशेषकरून उन्हाळ्यात पक्ष्यांच्या चाऱ्यासह पाण्याचा प्रश्न गंभीर बनताे. त्यामुळे पक्ष्यांसाठी अंगणवाड्यांत चारा-पाण्याची साेय करण्याचा मुद्दा समाेर आला हाेता. अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सकारात्मकता दाखविली. त्यामुळे सध्या सर्वच अंगणवाड्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

- बळीराम निपाणीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

चाैकट...

प्रकल्प अधिकाऱ्यांवर जबाबदारी...

जिल्ह्यात दहा प्रकल्प अधिकारी कार्यालये आहेत. पक्ष्यांसाठी चारा-पाणी या उपक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांवर साेपविली आहे. महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीही या उपक्रमाचा आढावा घेणार आहेत.