शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

रायगव्हाणसह पाच तलाव अद्यापही कोरडेठाक

By admin | Updated: September 26, 2014 01:20 IST

कळंब : पावसाळ्यातील केवळ हस्त व चित्रा ही दोनच नक्षत्रे शिल्लक राहिली असताना तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरलेल्या दहापैकी रायगव्हाण मध्यम प्रकल्पासह इतर पाच तलाव कोरडेठाक असून

कळंब : पावसाळ्यातील केवळ हस्त व चित्रा ही दोनच नक्षत्रे शिल्लक राहिली असताना तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरलेल्या दहापैकी रायगव्हाण मध्यम प्रकल्पासह इतर पाच तलाव कोरडेठाक असून, केवळ तीन तलावांत दखलपात्र तर दोन तलावाची पाणीपातळी जोत्याखाली आहे. तलावासह अन्य साठवण स्त्रोतांचीही पाण्याअभावी बिकट अवस्था असल्याने भविष्यात प्रतिकूल परिणाम भोगावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तालुक्यात रायगव्हाण मध्यम प्रकल्पासह देवधानोरा, शिराढोण, कोठाळवाडी, ढोराळा हे चार लघु पाटबंधारे प्रकल्प तर भाटसांगवी, आडसूळवाडी, येरमाळा, मलकापूर व चोराखळी हे पाच साठवण तलाव आहेत. याशिवाय लगतच्या मांजरा प्रकल्पाच्या बॅकवॉटरवर बोरगाव (ध), सेलू, मांडवा येथील लघु पाटबंधारे प्रकल्पांचाही तालुक्यातील शेतकऱ्यांना अप्रत्यक्षरित्या फायदा होत असतो. यावर्षी तालुक्यात मान्सूनचे आगमन तब्बल एक महिना उशिरा झाले. तदनंतरही पावसाने दडी मारली. पुन्हा आॅगस्ट अखेर आठ-दहा दिवस समाधानकारक पाऊस झाला. यानंतर जवळपास २५ दिवसांपासून तालुक्यात पावसाचा पत्ता नाही. मोठा पाऊस झाला नसल्याने तलाव क्षेत्रातील नद्या जास्त काळ वाहत्या झालेल्या नाहीत. तालुक्यातील येरमाळा भागातील येरमाळा, चोराखळी व मलकापूर या तीन तलावात दखलपात्र पाणीसाठा झालेला आहे. येरमाळा साठवण तलावात १.२८६ दलघमी उपयुक्त पाणी साठवण क्षमता असून, गुरूवारअखेर यामध्ये १.०७२ दलघमी पाणीसाठा होऊन हा तलाव ८३ टक्के भरला आहे. चोराखळी साठवण तलावाची क्षमा ३.१५७ दलघमी असून, सद्यस्थितीत १.९०२ म्हणजेच ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर ०.८६८ दलघमी साठवण क्षमता असलेला मलकापूर साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. या तीनच तलावात दखलपात्र व समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. (वार्ताहर)